संघात स्थान न मिळाल्याने निराश, भारतीय संघातील हा दिग्गज कधीही करू शकतो निवृत्तीची घोषणा

Shikhar Dhawan: न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी रोहित शर्माकडे वनडे संघाचं तर हार्दिक पांड्याकडे टी-२० संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. मात्र या संघात भारतीय क्रिकेटमधील एका दिग्गज फलंदाजाला स्थान मिळू शकलेलं नाही. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 06:48 PM2023-01-14T18:48:09+5:302023-01-14T18:49:08+5:30

whatsapp join usJoin us
Frustrated by his lack of a place in the team, the veteran of the Indian team can announce his retirement at any time | संघात स्थान न मिळाल्याने निराश, भारतीय संघातील हा दिग्गज कधीही करू शकतो निवृत्तीची घोषणा

संघात स्थान न मिळाल्याने निराश, भारतीय संघातील हा दिग्गज कधीही करू शकतो निवृत्तीची घोषणा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बीसीसीआयच्या निवड समितीने न्यूझीलंडविरुद्ध मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी शुक्रवारी संघाची घोषणा करण्यात आली. त्यात मर्यादित षटकांच्या वेगवेगळ्या प्रकारांसाठी दोन वेगवेगळ्या कर्णधारांची नियुक्ती करण्यात आली आहे. रोहित शर्माकडे वनडे संघाचं तर हार्दिक पांड्याकडे टी-२० संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. मात्र या संघात भारतीय क्रिकेटमधील एका दिग्गज फलंदाजाला स्थान मिळू शकलेलं नाही. 

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपाठोपाठ न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठीही सलामीवीर शिखर धवनला संघात स्थान देण्यात आलेले नाही. गेल्या काही काळापासून शिखर धवन हा खराब फॉर्ममध्ये होता. मात्र नोव्हेंबर महिन्यात झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी त्याच्याकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. मात्र आता त्याला थेट संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

३७ वर्षीय शिखन धवनला यापूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले नव्हते. तसेच बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतही त्याची कामगिरी निराशाजनक झाली होती. त्याने तीन सामन्यांमध्ये ३,८ आणि ७ अशा मिळून एकूण १८ धावा बनवल्या होत्या. तर गेल्या ५ डावांमध्ये त्याला केवळ ४९ धावाच जमवता आल्या आहेत. शिखर धवनने २०११ मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते.

शिखर धवन हा २०१३ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉपी स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघातील प्रमुख खेळाडू होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या भारतीय संघाने इंग्लंडला नमवून विजेतेपद पटकावले होते. त्या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत धवनने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावला होता.

शिखर धवनने भारताकडून ३४ कसोटी सामन्यात २३१५, १६७ एकदिवसीय सामन्यात ६७९३ धावा जमवल्या होत्या. त्याशिवाय ६८ टी-२०मध्ये १७५९ धावा जमवल्या आहेत.  

Web Title: Frustrated by his lack of a place in the team, the veteran of the Indian team can announce his retirement at any time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.