भारत-पाकिस्तान भांडणामुळे ICCसमोर पेच; वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर केले, पण...

ICC Women's Cricket World Cup : भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध जगजाहीर आहे. त्यामुळेच क्रिकेटच्या मैदानावर उभय संघ केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) स्पर्धेत समोरासमोर येतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 01:29 PM2020-03-11T13:29:08+5:302020-03-11T13:30:14+5:30

whatsapp join usJoin us
The full fixture list for next year's ICC Women's Cricket World Cup in New Zealand svg  | भारत-पाकिस्तान भांडणामुळे ICCसमोर पेच; वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर केले, पण...

भारत-पाकिस्तान भांडणामुळे ICCसमोर पेच; वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर केले, पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध जगजाहीर आहे. त्यामुळेच क्रिकेटच्या मैदानावर उभय संघ केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) स्पर्धेत समोरासमोर येतात. उभय देशांमध्ये द्विदेशीय मालिका केव्हाच बंद झाली आहे. त्यांच्या या वादामुळे आयसीसीचे डोकेदुखी वाढली आहे. आयसीसीनं बुधवारी २०२१मध्ये होणाऱ्या महिलांच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. ६ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२१ या कालावधीत न्यूझीलंडमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. आयसीसीनं हे वेळापत्रक जाहीर केले खरे, परंतु त्यात त्यांनी भारत आणि पाकिस्तान या संघांच्या लढती कधी व केव्हा होतील हेच नमूद केलेले नाही.

सहा विविध स्टेडियमवर ३१ सामन्यांची ही स्पर्धा रंगणार आहे. ऑकलंड, हॅमिल्टन, टौरांगा, वेलिंग्टन, ख्राईस्टचर्च आणि डुनेडीन येथे महिला वर्ल्ड कपचे सामने खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना ७ मार्चला ख्राईस्टचर्च येथे होईल. उपांत्य फेरीचे दोन सामने अनुक्रमे ३ व ४ मार्चला टौरांगा आणि हॅमिल्टन येथे होतील. बाद फेरीच्या तीनही सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आल्याचे आयसीसीआयनं जाहीर केले.  

या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आतापर्यंत चार संघांनीच पात्रता निश्चित केली आहे. यजमान म्हणून न्यूझीलंडने आपले स्थान आधीच पक्के केले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, गतविजेता इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे उर्वरित चार स्थानांसाठी चुरस आहे. महिला अजिंक्यपद स्पर्धेतून आणि पात्रता फेरीतून उर्वरित चार संघ ठरवण्यात येतील. 

महिला अजिंक्यपद स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालिका होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. ही मालिका होणार नाही हे निश्चित आहे, त्यामुळे आयसीसीलाही गुणांची विभागणी करण्यास विलंब होत आहे. महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत ( २०) आणि पाकिस्तान ( १६) अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत.  त्यामुळे आयसीसीनं वर्ल्ड कप स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केल्याचा दावा केला असला तरी केवळ चार संघांच्या लढती ठरल्या आहेत.


या स्पर्धेत आठ संघाचा सहभाग असणार आहे. प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध खेळेल आणि अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Corona वगैरे विसरा... क्रिकेट अन् आयपीएलचा आनंद लुटा... BCCI ची तिजोरी भरा!

सचिन तेंडुलकर पहिल्याच षटकात माघारी, पण इरफानची फटकेबाजी लै भारी!

 IPL रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

Web Title: The full fixture list for next year's ICC Women's Cricket World Cup in New Zealand svg 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.