BCCI Awards 2024 Live : शुबमन गिल, मोहम्मद शमी, आर अश्विन, जसप्रीत बुमराह सर्वोत्तम क्रिकेटपटू; वाचा संपूर्ण लिस्ट

BCCI Awards 2024 Live Updates: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI ) वार्षिक पुरस्काराचे आज वितरण करण्यात आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 07:02 PM2024-01-23T19:02:58+5:302024-01-23T19:04:51+5:30

whatsapp join usJoin us
Full list of BCCI Awards 2024 Live Updates: Shubman Gill wins the Poly Umrigar Award for 2022-23 Season, R Ashwin, Mohammed Shami, jasprit bumrah also win this award  | BCCI Awards 2024 Live : शुबमन गिल, मोहम्मद शमी, आर अश्विन, जसप्रीत बुमराह सर्वोत्तम क्रिकेटपटू; वाचा संपूर्ण लिस्ट

BCCI Awards 2024 Live : शुबमन गिल, मोहम्मद शमी, आर अश्विन, जसप्रीत बुमराह सर्वोत्तम क्रिकेटपटू; वाचा संपूर्ण लिस्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

BCCI Awards 2024 Live Updates: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI ) वार्षिक पुरस्काराचे आज वितरण करण्यात आले. मागील ४ वर्ष हा पुरस्कार सोहळा झालाच नव्हता आणि आज हैदराबाद येथे ३ वर्षांतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व फारुख इंजिनियर्स यांचा सीके नायुडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला भारत व इंग्लंड कसोटी संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.  बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी सोहळ्याला सुरुवात करताना रोहित शर्मा व राहुल द्रविड यांचे अभिनंदन केले. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांनी रोहित व द्रविडसह संपूर्ण टीमचे कौतुक केले.  



पुरस्कार प्राप्त खेळाडू...
 
  • माधवराव सिंधिया पुरस्कार - रणजी करंडक स्पर्धेत सर्वोत्तम विकेट्स

- जयदेव उनाडकत ( २०२०-२१), शाम्स मुलानी ( २०२१-२२), जलल सक्सेना ( २०२२-२३)

  • माधवराव सिंधिया पुरस्कार - रणजी करंडक स्पर्धेत सर्वोत्तम धावा

- राहुल दलाल ( २०२०-२१), सर्फराज खान ( २०२१-२२), मयांक अगरवाल ( २०२२-२३) 

  • लाला अमरनाथ पुरस्कार - देशांतर्गत स्पर्धेतील सर्वोत्तम अष्टपैलू

- बाबा अपराजित ( २०२०-२१), रिषी धवन ( २०२१-२२), रिषी धवन ( २०२२-२३), रियान पराग ( २०२२-२३)

  • लाला अमरनाथ पुरस्कार - रणजी करंडक सर्वोत्तम अष्टपैलू

- एमबी मोरासिंग ( २०२०-२१), शाम्स मुलानी ( २०२१-२२), साराशं जैन ( २०२२-२३) 

  • भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ

- मुंबई ( २०१९-२०), मध्य प्रदेश ( २०२१-२२), सौराष्ट्र ( २०२२-२३) 

  • वन डे क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट्स घेणारी महिला खेळाडू

- पुनम यादव ( २०१९-२०), झुलन गोस्वामी ( २०२०-२१), राजेश्वरी गायकवाड ( २०२१-२२), देविका वैद्य ( २०२२-२३)

  • वन डे क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारी महिला खेळाडू

- पुनम राऊत ( २०१९-२०), मिताली राज ( २०२०-२१), हरमनप्रीत कौर ( २०२१-२२), जेमिमा रॉड्रीग्ज ( २०२२-२३

  • दिलीप सरदेसाई पुरस्कार सर्वाधिक विकेट्स कसोटी - आर अश्विन ( २०२२-२३)
  • दिलीप सरदेसाई पुरस्कार कसोटीत सर्वाधिक धावा - यशस्वी जैस्वाल ( २०२२-२३)

  • सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण ( पुरुष)

 - मयांक अगरवाल ( २०१९-२०), अक्षर पटेल ( २०२०-२१), श्रेयस अय्यर ( २०२१-२२), यशस्वी जैस्वाल ( २०२२-२३) 

  • सर्वोत्तम क्रिकेटपटू ( महिला)

- दीप्ती शर्मा ( २०१९-२० व २०२२-२३), स्मृती मानधना ( २०२०-२१ आणि २०२१-२२)


  • पॉली उम्रीगर पुरस्कार सर्वोत्तम क्रिकेटपटू ( पुरुष )

- मोहम्मद शमी ( २०१९-२०), आर अश्विन ( २०२०-२१), जसप्रीत बुमराह ( २०२१-२२), शुबमन गिल ( २०२२-२३) 
 

  • सीके नायुडू जीवनगौरव पुरस्कार

- फारुख इंजिनियर, रवी शास्त्री 

 

Web Title: Full list of BCCI Awards 2024 Live Updates: Shubman Gill wins the Poly Umrigar Award for 2022-23 Season, R Ashwin, Mohammed Shami, jasprit bumrah also win this award 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.