Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धा सुरू होण्यासाठी दोन दिवस शिल्लक आहेत. श्रीलंका-अफगाणिस्तान यांच्या लढतीने आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. २८ ऑगस्टला भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धींच्या सामन्यांची सर्वांना उत्सुकता आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुले व्ही व्ही एस लक्ष्मणकडे हंगामी मुख्य प्रशिक्षकपद सोपवण्यात आले आहे. अशात भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर येत आहे. भारत- पाकिस्तान यांना एकाच गटात ठेवण्यात आले आहे आणि गटातील रिक्त असलेल्या तिसऱ्या जागेवर तगड्या संघाने एन्ट्री मारली आहे. या एका जागेसाठी चार संघांमध्ये चुरस रंगली होती आणि त्यात तीनही सामने जिंकून हाँगकाँगने मुख्य स्पर्धेची पात्रता निश्चित केली आहे.
आशिया चषक पात्रता स्पर्धेत हाँगकाँगने ( Hong Kong) शेवटच्या सामन्यात यजमान यूएईवर ( UAE) विजय मिळवून ६ गुणांसह मुख्य फेरीत प्रवेश केला. हाँगकाँगने मुख्य फेरीतील स्थान पक्के केल्यामुळे आशिया चषकाचं वेळापत्रक ( Asia Cup Schedule) पूर्ण झालं आहे. २८ ऑगस्टला भारताची लढत पाकिस्तानसोबत होणार आहे आणि आता ३१ ऑगस्टला हाँगकाँग विरुद्ध भारत असा सामना होणार आहे. त्यानंतर २ सप्टेंबरला हाँगकाँगचा सामना पाकिस्तानशी होईल. ६ संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे.
हाँगकाँगने पात्रता स्पर्धेत कुवैत व सिंगापूर यांना पराभूत केले आणि त्यानंतर अखेरच्या साखळी सामन्यात यूएईवर ८ विकेट्स व ६ चेंडू राखून विजय मिळवला. यूएईकडून कर्णधार चुंदानगापोयील रिझवान ( ४९) व झावर फरीद ( ४१) यांच्या खेळीच्या जोरावर यूएईने १४७ धावा केल्या. एहसान खान ( ४-२४), आयुष शुक्ला ( ३-३०) व ऐजाझ खान ( २-८) यांनी उत्तम गोलंदाजी केली. हाँगकाँगकडून कर्णधार निजाकत खान ( ३९), यासीम मुर्ताझा ( ५८) व बाबर हयात ( ३८*) यांनी दमदार बॅटींग केली.
- ग्रुप ए- भारत, पाकिस्तान, हांगकांग
- ग्रुप बी - श्रीलंका, बांग्लादेश अफगानिस्तान
आशिया चषक २०२२ चे संपूर्ण वेळापत्रक
- २७ ऑगस्ट - श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान - दुबई
- २८ ऑगस्ट - भारत विरुद्ध पाकिस्तान - दुबई
- ३० ऑगस्ट - बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - शारजा
- ३१ ऑगस्ट - भारत विरुद्ध हाँगकाँग
- १ सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश - दुबई
- २ सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग - शारजा
सुपर फोर
- ३ सप्टेंबर - बी१ विरुद्ध बी२ - शारजाह
- ४ सप्टेंबर - ए१ विरूद्ध ए२ - दुबई
- ६ सप्टेंबर - ए१ विरुद्ध बी१ - दुबई
- ७ सप्टेंबर - ए२ विरुद्ध बी२ - दुबई
- ८ सप्टेंबर - ए१ विरुद्ध बी२ - दुबई
- ९ सप्टेंबर - बी१ विरूद्ध ए२ - दुबई
- फायनल ११ सप्टेंबर - सुपर ४ मधील पहिला विरूद्ध दुसऱ्या ४ मधील पहिला - दुबई
भारतीय संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्षदीप सिंग, आवेश खान.
राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, दीपक चहर, अक्षर पटेल ( Standby: Shreyas Iyer, Deepak Chahar, Axar Patel)