Full Schedule of Indian team in T20 World Cup 2022 : विराट कोहलीनं भारतीय संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर टीम इंडिया नव्या कर्णधाराच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यासाठी सज्ज आहे. विराटच्या नेतृत्वाखालील अखेरच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. पाकिस्तानविरुद्ध वर्ल्ड कप स्पर्धेत कधी न हरणारा भारत प्रथमच पराभूत झाला. त्यानंतर न्यूझीलंडकडून हार मानवी लागली आणि पुढील फेरीतील मार्ग बंद झाला. २००७नंतर भारताला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावता आलेला नाही आणि आता रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया हा दुष्काळ संपवणार अशी चाहत्यांना आशा आहे.
भारताचा पहिला मुकाबला हा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्धच होणार आहे. त्यामुळे मागील वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवाची सव्याज परतफेड करण्यासाठी टीम इंडिया उत्सुक आहे. सुपर १२मध्ये संघांची दोन गटांत विभागणी केली आहे. ग्रुप १ मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांचा, तर ग्रुप २ मध्ये भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. या ८ संघांव्यतिरिक्त ४ संघ फर्स्ट राऊंडच्या निकालातून ठरतील. सुपर १२चे सामने ब्रिस्बेन, पर्थ, एडिलेड, सिडनी व मेलबर्न येथे होणार आहेत, तर होबार्ट व गिलाँग येथे फर्स्ट राऊंडचे सामने खेळवले जातील. भारताचे सामने मेलबर्न, सिडनी, पर्थ व एडिलेड या चार मैदानावर होतील.
भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक२३ ऑक्टोबर - विरुद्ध पाकिस्तान, मेलबर्न; दुपारी १.३० वाजल्यापासून २७ ऑक्टोबर - विरुद्ध ग्रुप ए चा उप विजेता, सिडनी; दुपारी १२.३० वाजल्यापासून३० ऑक्टोबर - विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पर्थ; सायंकाळी ४.३० वाजल्यापासून २ नोव्हेंबर - विरुद्ध बांगलादेश, एडिलेड; दुपारी १.३० वाजल्यापासून६ नोव्हेंबर - विरुद्ध ग्रुप बी चा विजेता, मेलबर्न; दुपारी १.३० वाजल्यापासून