ICC Men’s T20 World Cup 2022 Schedule Announced - ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक शुक्रवारी आयसीसीनं जाहीर केलं. १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ७ शहरांमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना MCG वर खेळवण्यात येईल. स्पर्धेच्या पहिल्या ६ दिवसांत म्हणजेत १६ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत फर्स्ट राऊंडचे सामने होतील. त्यानंतर २२ ऑक्टोबरपासून सुपर १२ च्या सामन्यांना सुरुवात होईल. सुपर १२मधील पहिलाच सामना गत वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीतील दोन संघांमध्ये म्हणजेच यजमान ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड ( Australia vs New Zealand) असा होईल. २३ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यात सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेत उतरणार आहे आणि २०२१मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याचा त्यांचा निर्धार असणार आहे.
सुपर १२मध्ये संघांची दोन गटांत विभागणी केली आहे. ग्रुप १ मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांचा, तर ग्रुप २ मध्ये भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. या ८ संघांव्यतिरिक्त ४ संघ फर्स्ट राऊंडच्या निकालातून ठरतील. सुपर १२चे सामने ब्रिस्बेन, पर्थ, एडिलेड, सिडनी व मेलबर्न येथे होणार आहेत, तर होबार्ट व गिलाँग येथे फर्स्ट राऊंडचे सामने खेळवले जातील. भारताचे सामने मेलबर्न, सिडनी, पर्थ व एडिलेड या चार मैदानावर होतील.
भारतीय संघ २३ ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना करेल. त्यानंतर २७ ऑक्टोबरला त्यांच्यासमोर फर्स्ट राऊंडच्या ग्रुप ए मधील उपविजेत्याशी होईल. त्यानंतर ३० ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिका, २ नोव्हेंबरला बांगलादेश आणि ६ नोव्हेंबरला ग्रुप बीच्या विजेत्याशी भारतीय संघ खेळेल.
Full schedule of the T20 World Cup 2022
फर्स्ट राऊंड१६ ऑक्टोबर - श्रीलंका विरुद्ध नामिबिया आणि क्वालिफायर २ विरुद्ध क्वालिफायर ३१७ ऑक्टोबर - वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड आणि क्वालिफायर १ विरुद्ध क्वालिफायर ४१८ ऑक्टोबर - नामिबिया विरुद्ध क्वालिफायर ३ आणि श्रीलंका विरुद्ध क्वालिफायर २१९ ऑक्टोबर - स्कॉटलंड विरुद्ध क्वालिफायर ४ आणि वेस्ट इंडिज विरुद्ध क्वालिफायर १२० ऑक्टोबर - श्रीलंका विरुद्ध क्वालिफायर ३ आणि नामिबिया विरुद्ध क्वालिफायर २२१ ऑक्टोबर - वेस्ट इंडिज विरुद्ध क्वालिफायर ४ आणि स्कॉटलंड विरुद्ध क्वालिफायर १
सुपर १२२२ ऑक्टोबर - न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान२३ ऑक्टोबर - ग्रुप ए चा विजेता विरुद्ध ग्रुप बी चा उप विजेता आणि भारत विरुद्ध पाकिस्तान२४ ऑक्टोबर - बांगलादेश विरुद्ध ग्रुप ए चा उप विजेता आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध ग्रुप बी चा विजेता२५ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया विरुद्ध ग्रुप ए चा विजेता२६ ऑक्टोबर - इंग्लंड विरुद्ध ग्रुप बी चा उप विजेता आणि न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान२७ ऑक्टोबर - दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश, भारत विरुद्ध ग्रुप ए चा उपविजेता आणि पाकिस्तान विरुद्ध ग्रुप बी चा विजेता२८ ऑक्टोबर - अफगाणिस्तान विरुद्ध ग्रुप बी उप विजेता आणि इग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया२९ ऑक्टोबर - न्यूझीलंड विरुद्ध ग्रुप ए चा विजेता३० ऑक्टोबर - बांगलादेश विरुद्ध ग्रुप बी चा विजेता, पाकिस्तान विरुद्ध ग्रुप ए चा उप विजेता आणि भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका३१ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया विरुद्ध ग्रुप बी चा उप विजेता१ नोव्हेंबर - अफगाणिस्तान विरुद्ध ग्रुप ए चा विजेता आणि इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड२ नोव्हेंबर - ग्रुप बी चा विजेता विरुद्ध ग्रुप ए चा उप विजेता आणि भारत विरुद्ध बांगलादेश३ नोव्हेंबर - पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका४ नोव्हेंबर - न्यूझीलंड विरुद्ध ग्रुप बी उप विजेता आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्ता५ नोव्हेंबर - इंग्लंड विरुद्ध ग्रुप ए चा विजेता ६ नोव्हेंबर - दक्षिण आफ्रिका विरुद्ध ग्रुप ए चा उप विजेता आणि पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, भारत विरुद्ध ग्रुप बीचा विजेता९ नोव्हेंबर - पहिली सेमी फायनल१० नोव्हेंबर - दुसरी सेमी फायनल१३ नोव्हेंबर - फायनल