Ireland vs England: T20 World Cup 2022 मध्ये बुधवारी एक धक्कादायक निकाल लागला. आयर्लंडच्या संघाने कागदावर बलाढ्य वाटणाऱ्या अशा वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडच्या संघाचा ५ धावांनी पराभव करत साऱ्यांनाच थक्क केले. आयर्लंडच्या संघाकडून कर्णधार बलबर्नी याने ४७ चेंडूत ६२ धावा आणि लॉर्कन टकरने ३४ धावा करत संघाला १५७ धावांची मजल मारून दिली. इंग्लंडची मात्र १५८ धावांचा पाठलाग करताना तारांबळ उडाली. महत्त्वाचे फलंदाज स्वस्तात माघारी गेले. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात १४.३ षटकानंतर पावसाने खेळ थांबला आणि डकवर्थ लुईस नियमानुसार आयर्लंडला ५ धावांनी विजयी घोषित करण्यात आले. या सामन्यात एक मजेदार किस्सा घडला आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
काय घडला किस्सा.. जाणून घ्या
आयर्लंड विरूद्ध इंग्लंड सामन्यात एक अशी घटना घडली, ज्याने सगळीकडे हशा पिकला. हे प्रकरण आयर्लंडच्या फलंदाजीच्या वेळेत घडले. जेव्हा अँडी फलंदाजी करत होता आणि त्याच्यासमोर इंग्लंडचा युवा अष्टपैलू खेळाडू सॅम करन होता, त्यावेळी हा किस्सा घडला. आयर्लंडच्या डावातील १५ वे षटक खेळले जात होते. करनने शॉर्ट बॉल टाकला आणि अँडीने तो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला. चेंडू स्टँड्समध्ये गेला. तिथे बसलेल्या एका प्रेक्षकाने हा चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला, पण या प्रयत्नात तो खुर्चीवरून खालीच कोसळला. घडलेला प्रकार प्रचंड मजेशीर होता. इतकेच नव्हे तर पडलेला व्यक्ती स्वत:ला सावरत उठला, त्यानंतर तो स्वतः देखील त्या घटनेवर हसताना दिसला. पाहा हा व्हिडिओ-
असा रंगला सामना
इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात आज आयर्लंडने साऱ्यांनाच थक्क केले. इंग्लंडने नाणेफेक जिंकली, पण त्यानंतर कोणतीच गोष्ट त्यांच्या बाजूने घडली नाही. आयर्लंडच्या संघाने सुरूवातीपासूनच तुफान फटकेबाजी केली. कर्णधार बलबर्नी याने ४७ चेंडूत ६२ धावा करत दमदार अर्धशतक ठोकले. लॉर्कन टकरनेही ३४ धावा करत त्याला चांगली साथ दिली. या दोघांच्या फटकेबाजीमुळे आयर्लंडनने १५७ धावांची मजल मारली.
इंग्लंडची मात्र १५८ धावांचा पाठलाग करताना तारांबळ उडाली. जोस बटलर, अलेक्स हेल्स, बेन स्टोक्स यांना दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही. डेव्हिड मलानने ३७ चेंडूत ३५ तर ब्रूक्स २१ चेंडूत १८ धावा करत सामन्यातील आव्हान जिवंत ठेवले. मोईन अलीने त्यानंतर फटकेबाजीला सुरूवात केलीच होती, पण पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबला. त्यावेळी १४.३ षटकात इंग्लंडची धावसंख्या ५ बाद १०५ इतकीच झाली. त्यामुळे डकवर्थ लुईस पद्धतीप्रमाणे आयर्लंडला ५ धावांनी विजयी घोषित करण्यात आले
Web Title: Funny cricket Video spectators fell down from chair trying to take catch England vs Ireland match t20 world cup 2022
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.