ब्रिस्बेन : भारतीय संघाने विश्वचषकात आपली विजयी सुरूवात केली आहे. संघाने सोमवारी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सराव सामन्यात 6 धावांनी शानदार विजय मिळवला. या सामन्यासाठी संघाच्या प्लेइंग इलेव्हवनमध्ये विशेष बदल करण्यात आला होता. यष्टीरक्षक खेळाडू रिषभ पंतला संधी न दिल्याने आजचा सामना फारच चर्चेत राहिला. रिषभ पंतला पहिल्या सामन्यात संधी न दिल्याने सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी संघाच्या व्यवस्थापन समितीवर निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे.
दरम्यान, अलीकडेच पार पडलेल्या वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सराव सामन्यात पंतला संधी देण्यात आली होती. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या दोन्ही सामन्यात ऋषभ पंतने सलामीवीर म्हणून फलंदाजी केली होती. मात्र तो त्या दोन्ही सामन्यांमध्ये काही खास कामगिरी करू शकला नव्हता. दोन्ही सामन्यात पंत केवळ 9-9 धावा करून बाद झाला होता. अशा स्थितीत ब्रिस्बेनमध्ये झालेल्या पहिल्या अधिकृत सराव सामन्यात संघ व्यवस्थापनाने पंतला संधी दिली नाही.
भारतीय संघाची विजयी सलामी सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ब्रिस्बेन स्टेडियमवर सामना खेळवला गेला. भारतीय संघाने शानदार खेळी करून कांगारूच्या संघावर 6 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 बळी पटकावले. तर भुवनेश्वर कुमार (2), अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या, आणि युजवेंद्र चहल यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 186 धावा केल्या होत्या. ज्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाला 20 षटकांत सर्वबाद 180 धावा करण्यात यश आले. भारताकडून सलामीवीर लोकेश राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतकी खेळी केली होती. यांच्याव्यतिरिक्त कर्णधार रोहित शर्मा (15), विराट कोहली (19) आणि दिनेश कार्तिक (20) धावा करून बाद झाला.
आगामी सराव सामने खालीलप्रमाणे
19 ऑक्टोंबर -अफगाणिस्तान विरूद्ध पाकिस्तान बागंलादेश विरूद्ध दक्षिण आफ्रिका भारत विरूद्ध न्यूझीलंड
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"