आयपीएलमध्ये समालोचन करत असलेल्या आकाश चोप्रा याची खिल्ली काही क्रिकेट चाहत्यांनी उडवली आहे.आकाश चोप्रा हा गेल्य ाकाही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंची खिल्ली उडवतो. पण त्याच्या जुन्या काळातील कामगिरीचीच चर्चा सोशल मिडीयावर सुरू झाली. चोप्राच्या कामगिरीवर मनिष नावाच्या एका ट्विटर युजरने म्हटले की, जेव्हा तुमची इच्छा ही फक्त समालोचक होण्याची असते पण पालकच तुम्हाला क्रिकेटर होण्यासाठी भाग पाडतात.’ त्यावर इतर युजरनीही आपापाल्या कमेंट करत चोप्राची खिल्ली उडवली.
ट्विटर युजर्संच्या या टिंगलखोर ट्विटवर आकाश चोप्राही गप्प बसला नाही. त्यानेही म्हटले की, हे खूप गमतीशर आहे. पण मी आभारी आहे. त्यांनी मला क्रिकेट खेळायला प्रोत्साहित केले. मी नशिबवान आहे. त्या २९६ खेळाडुंपैकी एक आहे, ज्यांना भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. आकाश चोप्राने आयपीएलच्या सात सामन्यात फक्त ५३ धावा केल्या आहेत. त्यातही त्याने तब्बल ७० चेंडू घेतले होते. त्याचा स्ट्राईक रेट देखीलफारसा चांगला नाही. त्याची सर्वोच्च कामगिरी ही २४ धावा आहे. त्याच्या या कामगिरीची एक स्क्रिन शॉट देखील व्हायरल होत आहे, असे असले तरी आकाश चोप्राने दहा कसोटीत नेतृत्व करताना दोन अर्धशतके ही झळकावली होती.