VIDEO: "तुझ्या आयुष्यातील सर्वात अमूल्य गिफ्ट कोणतं?", कॅप्टन कूल धोनीच्या उत्तराने ॲंकरची बोलती बंद

महेंद्रसिंग धोनीच्या जुन्या मुलाखतीतील एक मजेशीर किस्सा खूप व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 12:14 PM2022-10-08T12:14:26+5:302022-10-08T12:15:01+5:30

whatsapp join usJoin us
 funny part of MS Dhoni's interview with Mandira Bedi is going viral  | VIDEO: "तुझ्या आयुष्यातील सर्वात अमूल्य गिफ्ट कोणतं?", कॅप्टन कूल धोनीच्या उत्तराने ॲंकरची बोलती बंद

VIDEO: "तुझ्या आयुष्यातील सर्वात अमूल्य गिफ्ट कोणतं?", कॅप्टन कूल धोनीच्या उत्तराने ॲंकरची बोलती बंद

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा सेलिब्रिटी टॉक शो होस्ट मंदिरा बेदी यांच्या मुलाखतीचा एक जुना व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, बेदींनी विचारलेल्या प्रश्नाला धोनीने सडेतोड उत्तर दिले आहे, जे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. मात्र त्याच्या या उत्तरामुळे सोशल मीडियावर त्याची वेगळीच चर्चा रंगली आहे. काही युजर्स एमएस धोनीच्या या स्पॉट रिस्पॉन्सचे कौतुक करत आहेत, तर काही जण धोनीवर टीका करताना दिसत आहेत.

खरं तर ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडीओ २०१६ च्या मुलाखतीचा आहे. ॲंकर बेदी धोनीला त्याच्या आयुष्यात मिळालेल्या सर्वात मौल्यवान भेटवस्तूबद्दल विचारणा करतात. जेव्हा धोनी उत्तर सांगण्यासाठी थोडा वेळ विचार करतो तेव्हा बेदी यांनी त्याला हिंट देताना सांगितले की, त्याला मिळालेली सर्वात मोठी भेट म्हणजे त्याची मुलगी. 

धोनीच्या उत्तराने पिकला हशा 
मात्र धोनीने मंदीरा बेदी यांनी सुचवलेल्या उत्तराला पूर्णपणे नकार दिला. धोनी म्हणाला, "मी यासाठी खूप मेहनत घेतली होती त्यामुळे ही भेटवस्तू नव्हती." धोनीच्या या उत्तराने ॲंकर बेदी यांच्यासहीत प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. ही मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून नेटकरी यावर भन्नाट प्रतिक्रिया देखील देत आहेत. काही युजर्स धोनीच्या या स्पॉट उत्तराचे कौतुक करत आहेत, तर काहीजण त्याच्यावर टीकाही करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

 

Web Title:  funny part of MS Dhoni's interview with Mandira Bedi is going viral 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.