Marnus Labuschagne Wicket, Ashes 2022: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अँशेस मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना शुक्रवारपासून होबार्टच्या मैदानावर सुरू झाला. इंग्लंडच्या संघाने पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाला धक्के दिले. सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ५ बाद २१५ अशी मजल मारली. या पहिल्या दिवसाच्या खेळात एक असा प्रकार घडला की सामना पाहणारा प्रत्येक हसून लोटपोट झाला.
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा स्टुअर्ट ब्रॉडने चेंडू टाकला. तो चेंडू खेळण्यासाठी मार्नस स्टंपच्या रेषेतून थोडासा बाहेर गेला आणि त्रिफळाचीत जाला. पण शॉट खेळताना लाबुशेन इतका विचित्र प्रकारे फसला की त्याला काही करताच आला नाही. त्यामुळे चेंडूने सरळ स्टंपचा वेध घेतला. लाबुशेन शॉट खेळताना त्याचा पाय सरकला आणि तो जमिनीवर पडला.
पाहा लाबुशेनचा व्हिडीओ-
स्टुअर्ट ब्रॉड हा इंग्लंडचा अनुभवी आघाडीचा गोलंदाज आहे. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीवर अशा प्रकारचा शॉट खेळण्यासाठी लाबुशेनने जो स्टान्स घेतला त्याने सारेच हैराण झाले. पण महत्त्वाची बाब म्हणजे लाबुशेन शॉट खेळताना पडला आणि त्यानंतर लाबुशेन थेट जमिनीवर पडला. नक्की काय घडलं हे त्यालाही समजलं नाही, त्यामुळे तोदेखील रिप्ले पाहून डोक्याला हात लावून बसला. लाबुशेनचा हा व्हि़डीओ तुफान व्हायरल होत आहे.