Join us  

टी-२० विश्वचषकाचे भविष्य अधांतरी; ऑस्ट्रेलियाची कबुली

४०२ कोटींचे नुकसान होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 11:39 PM

Open in App

मेलबोर्न : करोनामुळे जगात सर्वत्र प्रवासबंदी असल्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात येथे आयोजित टी-२० विश्वचषकाचे भविष्य अधांतरी असल्याची कबुली क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्रथमच दिली आहे. स्पर्धा रद्द झाल्यास किमान ४०२ कोटींचे (आठ कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर)नुकसान सोसावे लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सीएचे सीईओ केविन रॉबर्ट्स यांनी विश्वचषकाचे आयोजन मोठ्या जोखिमेचे असल्याचे मान्य केले. ते म्हणाले, ‘निर्धारित कालावधीत विश्वचषकाचे आयोजन व्हावे, याबाबत आम्ही सर्वजण आशावादी आहोत, मात्र जोखीमदेखील मोठी आहे.’

आयसीसीने विश्वचषकाचा निर्णय १० जूनपर्यंत लांबणीवर टाकला. आणीबाणीविषयक योजनेवर निर्णय घेण्यासाठी काही वेळ हवा, असे आयसीसीचे मत आहे. ही स्पर्धा झाली तरी ती रिकाम्या स्टेडियममध्येच करावी लागेल. प्रेक्षकांच्या उपस्थितीतून सीएला किमान पाच कोटी ऑस्ट्रेलियन डॉलरचे उत्पन्न मिळू शकते. सामन्यांचे आयोजन करण्यासाठी आम्हाला जैविक सुरक्षा उपाय योजावे लागतील. त्यासाठी एक कोटी ऑस्ट्रेलियन डॉलरचा खर्च येईल, असे रॉबर्ट्स यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केवळ एकाच स्थानी होण्याची शक्यता

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर भारताविरुद्ध कसोटी मालिकेच्या कार्यक्रमात बदल करण्याची शक्यता फेटाळलेली नाही. त्यांना एकाच स्थळावर सामन्यांच्या आयोजनाचा पर्याय खुला ठेवला आहे. क्रिकेट आॅस्ट्रेलियाने गुरुवारी घोषणा केली होती की, भारताविरुद्ध कसोटी सामने अनुक्रमे ब्रिस्बेन (३ ते ७ डिसेंबर), अ‍ॅडिलेड (११ ते १५ डिसेंबर), मेलबोर्न (२६ ते ३० डिसेंबर) आणि सिडनी ३ ते ७ जानेवारी ) खेळले जातील.

दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी केव्हिन रॉबटर्््स म्हणाले की, स्वास्थ्य संकट बघता प्रवासावरील निर्बंधांमुळे कार्यक्रमामध्ये बदल होऊ शकतो. शुक्रवारी पत्रकारांसोबत बोलताना ते म्हणाले, ‘प्रांतीय सीमा प्रवासासाठी खुल्या राहतील, असा विचार करून सध्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. मालिकेचे आयोजन एक किंवा दोन स्थळांवरच करावे लागण्याची शक्यता त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून राहील.’ रॉबर्ट््स पुढे म्हणाले, ‘अनेक पर्याय आहेत. आमच्याकडे चार प्रांतांची चार स्थळे आहेत किंवा एकाच प्रांताच्या एकाच स्थळावर याचे आयोजन करता येईल. सध्या अनेक शक्यता आहेत.

टॅग्स :आॅस्ट्रेलियाभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया