Shikhar Dhawan Batting Video: टीम इंडियाचा माजी सलामीवीर शिखर धवनने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच्या या निर्णयाने चाहत्यांना धक्का बसला होता. तो अनेक दिवसांपासून टीम इंडियात परतण्यात अपयशी ठरत होता. पण निवृत्तीनंतर तो पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसणार आहे. IPL 2025 च्या मेगा लिलावाची चर्चा जोरात सुरू आहे. त्याआधी 'गब्बर' लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत दिसणार आहे. त्यासाठी त्याने आज नेट्समध्ये शानदार फलंदाजी केली. त्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
धवनने शेअर केला व्हिडिओ
शिखर धवनने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धवन उत्कृष्ट फलंदाजी करताना दिसत आहे. धवनने चौफेर फटके खेळले आहेत. त्याने रिव्हर्स स्वीपही मारल्याचे दिसत असून तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर काही वेळाच्या विश्रांतीनंतर धवन नेट्समध्ये परतला. त्याचा फलंदाजीचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले की, 'परत क्रिकेटच्या मैदानात येऊन बरे वाटले.'
व्हिडीओमधील शिखर धवनची फटकेबाजी पाहता सहज अंदाज लावला जाऊ शकतो की तो IPL 2025 मध्ये दमदार खेळ करून दाखवेल. आगामी IPL मध्ये धवन ॲक्शनमध्ये दिसणार आहे. मात्र, पंजाब संघ धवनला कायम ठेवतो की गब्बर अन्य जर्सीमध्ये दिसतो ते अद्याप सांगता येणार नाही. २४ ऑगस्ट रोजी धवनने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर आता तो लिजंड्स लीग स्पर्धेत सुरेश रैना, इरफान पठाण, युसूफ पठाण आणि झहीर खान अशा अनेक खेळाडूंसह दिसणार आहे.