Join us  

Shikhar Dhawan, IPL 2022 PBKS vs CSK Live: पंजाबचा 'गब्बर शेर' फॉर्मात! विक्रमी खेळीसह CSKच्या गोलंदाजांची केली धुलाई

धवनने केली नाबाद ८८ धावांची दमदार खेळी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 9:27 PM

Open in App

Shikhar Dhawan, IPL 2022 PBKS vs CSK Live: पंजाब किंग्जचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन याने धडाकेबाज खेळी करत संघाला २० षटकांत ४ बाद १८७ धावांपर्यंत मजल मारून दिली. चेन्नईने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर आपला २००वा IPL सामना खेळणाऱ्या शिखर धवनने तुफान फटकेबाजी केली. त्याने भानुका राजपक्षेसोबत शतकी भागीदारी केली. पण त्याला मात्र ८७ धावांवर नाबाद राहावे लागले.

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मयंक अग्रवाल - शिखर धवन जोडीने चांगली सुरूवात केली होती. मयंक १८ धावांवर बाद झाला. पण शिखऱ आणि राजपक्षे यांनी शतकी भागीदारी केली. ११० धावांच्या भागीदारीनंतर राजपक्षे ४२ धावांवर बाद झाला. लियम लिव्हिंगस्टोनने देखील ७ चेंडूत १९ धावा काढत उपयुक्त खेळी केली. पण शिखर धवनने मात्र शेवटपर्यंत खिंड लढवली. त्याने ५५ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ८८ धावा कुटल्या. 

चेन्नईने संघात एकही बदल केला नाही. पण पंजाबने मात्र संघात तीन महत्त्वाचे बदल केले. शाहरूख खान, नॅथन एलिस आणि वैभव अरोरा या तिघांना पंजाबने संघाबाहेर ठेवले. त्यांच्या जागी भानुका राजपक्षे, रिषी धवन आणि संदीप शर्मा या तिघांना संघात स्थान देण्यात आले.

पंजाब किंग्ज- मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, भानुका राजपक्षे, लियम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), ऋषी धवन, कगिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, संदीप शर्मा.

चेन्नई सुपर किंग्ज- ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मिचेल सँटनर, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी (विकेटकीपर), ड्वेन ब्राव्हो, ड्वेन प्रिटोरियस, मुकेश चौधरी, महेश तिक्षणा.

टॅग्स :आयपीएल २०२२शिखर धवनपंजाब किंग्सचेन्नई सुपर किंग्स
Open in App