Join us  

गब्बरचं ट्विटर अकाऊंट झालं हॅक; क्रिकेटपटूंना गेले धवनच्या नावाने काही मेसेजेस

धवनच्या या शतकाची स्तुती सर्वदूर सुरु असताना, त्याच्या ट्विटर अकाऊंटवरवरून काही मेसेज क्रिकेटपटूंना गेले. या मेसेजचा साऱ्यांनाच धक्का बसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 5:12 PM

Open in App
ठळक मुद्देशिखर धवनचा ट्विटरवरील मेसेज वाचा

दुबई, आशिया चषक 2018 : रविवारी झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनने दमदार शतक लगावले. त्याच्या या शतकाची स्तुती सर्वदूर सुरु असताना, त्याच्या ट्विटर अकाऊंटवरवरून काही मेसेज क्रिकेटपटूंना गेले. या मेसेजचा साऱ्यांनाच धक्का बसला. पण कुणालाही काही कळत नव्हतं. अखेर अफगाणिस्तानच्या रशिद खानने ही गोष्ट लक्षात आणून दिली आणि आपलं अकाऊंट हॅक झाल्याचे लक्षात आले.

बऱ्याच क्रिकेटपटूंनी धवनला या मेसेजबद्दल विचारले आणि हे नेमके काय झाले, हे त्याला कळत नव्हते. पण अखेर त्याला आपले अकाऊंट हॅक झाल्याचे समजले आणि त्याने ट्विटरवर एक मेसेज टाकला.

ट्विटरवर धवनने सांगितले की, " माझ्या ट्विटर अकाऊंटवरून जर कुणाला मेसेज आलेअसतील तर कृपया ते पाहू नयेत. कारण माझे अकाऊंट हॅक झाले आहे. त्यामुळे कृपया माझ्या अकाऊंटवरून आलेले मेसेज गंभीरतेने घेऊ नका. "

शिखर धवनचा ट्विटरवरील मेसेज वाचा

टॅग्स :शिखर धवनआशिया चषकभारत विरुद्ध पाकिस्तान