IPL 2023, CSK vs RCB : Controversial decision - इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये मागील काही सामने रोमहर्षक झाले.. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यांची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली होती. काल चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातला सामनाही अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला. चेन्नईने ८ धावांनी हा सामना जिंकण्यात यश मिळवले, परंतु चाहत्यांच्या मते तिसऱ्या अम्पायरच्या एका चुकीच्या निर्णयामुळे RCBचा पराभव झाला. महेंद्रसिंग धोनीची ( MS Dhoni) ती चूक अम्पायरने नजरअंदाज केली नसती, तर निकाल काही वेगळा लागला असता.
गोलंदाजाच्या फ्रंट फूट नो बॉलचा निर्णय आता टीव्ही अम्पायर देतात. पण, यावेळी CSKचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडून झालेली चूक तिसऱ्या अम्पायरकडून नजरअंदाज झाली. रवींद्र जडेजाने टाकलेल्या चेंडूवर दिनेश कार्तिक फसला अन् ४१ वर्षीय धोनीने तो टिपून स्टम्पिंग केले. अपील केल्यानंतर मैदानावरील अम्पायरने तिसऱ्या अम्पायरची मदत घेतली. मायकेल गॉफ तिसरा अम्पायर होता आणि त्याने अंतिम निर्णय हा कार्तिकच्या बाजूने दिला.
धोनीने जेव्हा बेल्स उडवल्या तेव्हा कार्तिकचा पाय क्रिजमध्ये होता. पण, हा निर्णय देताना गॉफकडून धोनीची एक चूक निसटली. धोनीने तो चेंडू स्टम्पच्या पुढे पकडला होता. नियमानुसार यष्टिंच्या आधी यष्टिरक्षकाने चेंडू पकडल्यास तो नो बॉल दिला जातो. पण, हिच गोष्ट गॉफ यांच्या नजरेतून निसटली. तो नो बॉल दिला असता तर कार्तिकने आणखी एक षटकार खेचला असता. पुढे RCB वरील दडपण कमी झाले असते अन् मॅचचा निकाल वेगळा लागला असता असे बंगळुरूच्या फॅन्सचं मत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Game changing Controversial decision : MS Dhoni's Big mistake overlooked by third umpire in CSK vs RCB clash of IPL 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.