मधल्या फळीला हवी नशिबाची साथ- गांगुली

गोलंदाजीचा विचार करताना विंडीजने तीन लढतींमध्ये ९०० पेक्षा अधिक धावा फटकावल्या आहेत. भारताच्या मधल्या फळीला नशिबाची साथ लाभणे आवश्यक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 04:13 AM2018-10-29T04:13:13+5:302018-10-29T04:13:39+5:30

whatsapp join usJoin us
Ganguly, the middle-order batsman, wants luck | मधल्या फळीला हवी नशिबाची साथ- गांगुली

मधल्या फळीला हवी नशिबाची साथ- गांगुली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

विशाखापट्टणममध्ये विंडीज संघाकडून थोड्या फरकाने झालेली चूक त्यांनी शनिवारी पुणे येथे सुधारली. जेसन होल्डर व त्याच्या संघासाठी हा शानदार विजय होता. या निकालामुळे अखेरच्या दोन लढतींमध्ये रंगतदार क्रिकेट अनुभवाला मिळण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळाले.

एकतर्फी कसोटी मालिकेनंतर विंडीज संघाने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी केली. कर्णधारपदाच्या क्षमतेसह होल्डर आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरला. शाई होप, शिमरोन हेटमेयर आणि अ‍ॅश्ले नर्स यांनी कॅरेबियन क्रिकेटमध्ये सध्यातरी सर्वकाही संपलेले नसल्याचे संकेत दिले. शिमरोन हेटमेयर व होप यांच्यात क्षमता व प्रतिभा असून, त्यांना योग्य मार्गदर्शन लाभले तर ते प्रदीर्घ काळ कॅरेबियन क्रिकेटचा झेंडा उंचावू शकतात. संघनिवडीबाबतच्या समस्यांवर तोडगा निघाला तर वेस्ट इंडिज पुन्हा एकदा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मोठी शक्ती म्हणून छाप पाडू शकते, असा मला विश्वास आहे.

होप व हेटमयेर यांची सर्वात सकारात्मक बाब म्हणजे फलंदाजी. भारतीय खेळपट्ट्यांवर त्यांनी फिरकीपटूंना समर्थपणे तोंड दिले. भूतकाळात तर दिग्गज संघांच्या फलंदाजांनाही हे शक्य झालेले नाही. भारतीय संघाबाबत चर्चा केली तर केवळ ‘विराट कोहली शो’ असल्याची प्रचिती येते. विराटच्या असाधारण प्रतिभेबाबत बोलण्यासाठी आता काही शिल्लक नाही. काहींच्या मते, विराटची प्रतिभा व गोलंदाजांवर वर्चस्व गाजविण्याची क्षमता ब्रॅडमनप्रमाणे आहे. काहींच्या मते, तो सचिनचा १०० शतकांचा विक्रम पिछाडीवर सोडेल. ब्रायन लारा आणि व्हिव्हियन रिचर्डस्सोबतही त्याची तुलना होत आहे. आकडेवारीचा विचार न करता आम्ही त्याच्या दर्जाचा आनंद घेत आहोत.

लोकेश राहुलला बाहेर बसवता येऊ शकत नाही. संघव्यवस्थापनाला त्याला संघात स्थान देण्यासाठी मार्ग शोधावा लागेल. बुमराहने तो इतरांपेक्षा वेगळा का आहे, हे सिद्ध केले. पण गोलंदाजीचा विचार करताना विंडीजने तीन लढतींमध्ये ९०० पेक्षा अधिक धावा फटकावल्या आहेत. भारताच्या मधल्या फळीला नशिबाची साथ लाभणे आवश्यक आहे. (गेमप्लॅन)

Web Title: Ganguly, the middle-order batsman, wants luck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.