Join us  

गांगुली दुबईत दाखल तयारीचा आढावा घेणार

यूएईमध्ये एक समस्या सर्व खेळाडूंना जाणवत आहे. ही समस्या आहे उष्णतेची.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 11:41 PM

Open in App

दुबई : यूएईत आयपीएलची तयारी नेमकी कशी सुरू आहे, हे पाहण्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली बुधवारी दुबईत दाखल झाले.दुबईला रवाना होण्यापूर्वी गांगुली यांनी चांगलीच सुरक्षेची काळजी घेतली होती. गेल्या सहा महिन्यामध्ये आपण पहिल्यांदाच विमानात बसून दुबईला जात आहोत, अशी प्रतिक्रिया गांगुली यांनी व्यक्त केली.

भारतातील कोरोना व्हायरसची स्थिती भयावह असल्याने यूएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीमध्ये लीग खेळविण्याचा बीसीसीआयने निर्णय घेतला. गांगुली यांनी दुबईला जाण्यापूर्वी विमानतळावर एक फोटो काढला आणि इन्स्टाग्रामवर तो पोस्ट केला. या फोटोमध्ये गांगुली यांनी चक्क दोन मास्क घातल्याचे पाहायला मिळत आहे.गांगुली येथे सहा दिवस विलगीकरणात राहणार असून ते २३ सप्टेंबरपर्यंत यूएईत वास्तव्य करतील, असे सांगितले जात आहे.

यूएईमध्ये एक समस्या सर्व खेळाडूंना जाणवत आहे. ही समस्या आहे उष्णतेची. कारण भारतापेक्षा जास्त तापमान यूएईमध्ये आहे. त्यामुळे दिवस सराव करणे खेळाडूंना शक्य होत नसल्याचे दिसत आहे. आयपीएलमध्ये काही सामने दुपारी ३.३० वाजताही सुरू होणार आहेत. त्यावेळी खेळाडूंच्या फिटनेसची खरी चाचणी होणार आहे. आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल हे आधीपासूनच येथे आहेत. (वृत्तसंस्था)

टॅग्स :सौरभ गांगुलीआयपीएल 2020