Join us  

‘गांगुली-सचिन दमदार माऱ्याविरुद्ध खेळले’

चॅपेल यांनी आपल्या स्तंभात म्हटले आहे की, ‘कोहली व रोहित भारताचे एकदिवसीय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 2:32 AM

Open in App

नवी दिल्ली : ‘विराट कोहली व रोहित शर्मा खोºयाने धावा वसूल करीत आहेत, पण उच्च पातळीवर गोलंदाजांना सामोरे जाण्याची चर्चा केल्यास सचिन तेंडुलकर व सौरव गांगुली या जोडीपुढे अधिक कडवे आव्हान होते,’ असे आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल म्हणाले.

चॅपेल यांनी आपल्या स्तंभात म्हटले आहे की, ‘कोहली व रोहित भारताचे एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे बोलले जाते. त्यांना आव्हान देणारी सचिन तेंडुलकर व सौरव गांगुली ही जोडी आहे. त्यांनी १५ वर्षे आंतरराष्ट्रीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले.’ चॅपेल यांनी गांगुली-तेंडुलकर यांच्या काळात प्रत्येक आंतरराष्ट्रीय संघात दोन चांगले वेगवान गोलंदाज होते, असेही म्हटले.चॅपेल यांनी म्हटले की, ‘सचिन-गांगुली जोडीने आपल्या कारकिर्दीत जास्तीत जास्त वेळ सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांच्या जोडीविरुद्ध डावाची सुरुवात केली आहे. पाकिस्तानचे वसीम अक्रम व वकार युनिस, वेस्ट इंडिजचे कर्टनी अ‍ॅम्ब्रोस व कर्टनी वॉल्श, आॅस्ट्रेलियाचे ग्लेन मॅक् ग्रा व ब्रेट ली, दक्षिण आफ्रिकेचे अ‍ॅलन डोनाल्ड व शॉन पोलॉक, श्रीलंकेचे लसिथ मलिंगा व चामिंडा वास या गोलंदाजांविरुद्ध खेळताना कुठल्याही फलंदाजाचा कस लागत होता.’ 

टॅग्स :सचिन तेंडुलकरसौरभ गांगुली