Join us  

गांगुलींचे वक्तव्य आयपीएल होण्यास आश्वासक - इरफान

ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक आयोजित होण्याची शक्यता मावळली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 11:52 PM

Open in App

नवी दिल्ली : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यंदा आयपीएल आयोजित करण्याबाबत केलेले वक्तव्य क्रिकेटपटूंसाठी मोठे आश्वासक ठरले आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक आयोजित होण्याची शक्यता मावळली आहे. गांगुली यांनी राज्य संघटनांना लिहिलेल्या पत्रात आयपीएल आयोजनाची इच्छा व्यक्त केल्यामुळे आयोजनाची शक्यता वाढल्याचे मत माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने बुधवारी मांडले.कोरोनामुळे यंदा १६ संघांचा समावेश असलेला टी-२० विश्वचषक आयोजित करणे अशक्यप्राय असल्याची कबुली क्रिकेट आॅस्ट्रेलियाने कालच दिली होती. या पार्श्वभूमीवर स्टार स्पोर्टस्च्या ‘क्रिकेट कनेक्टेड’शोमध्ये इरफान म्हणाला, ‘मी काल जे वाचले त्यावरून आयपीएल आयोजनाच्या प्रयत्नाचे संकेत मिळत आहेत. प्रत्येक जण आयपीएलचे आयोजन पाहू इच्छितो. याउलट कोरोना लॉकडाऊनमधील प्रतिबंधांमुळे विश्वचषकाचे आयोजन अधिक अडचणीचे ठरणार आहे.’अनेक जण आॅस्ट्रेलियातील विश्वचषकावर चर्चा करतात. मात्र व्यक्तिश: माझे मत असे की, आॅस्ट्रेलियात नियम फार कठोर आहेत. नियमांचे काटेकोर पालन केले जाते. कितीही बारीक नियम असेल तरी तो शंभर टक्के अमलात येतो. तेथे प्रत्येक स्थितीवर नजर असते. विलगीकरणासह सामन्यांचे आयोजन करणे फारच कठीण असल्याचे मत इरफानने व्यक्त केले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :आयपीएलबीसीसीआयसौरभ गांगुलीइरफान पठाण