नवी दिल्ली : ‘कोचिंगमध्ये मला रुची नव्हती. भारतीय संघाच्या कोचपदासाठी अर्जदेखील केला नव्हता. तरीही २००७ मध्ये केवळ सात मिनिटात हे पद माझ्याकडे आले होते. महान खेळाडू सुनील गावसकर यांनी यात मोलाची भूमिका बजावली होती.’ द. आफ्रिकेचे माजी खेळाडू आणि विश्वविजेत्या भारतीय संघाचे कोच राहिलेले गॅरी कर्स्टन यांनी या स्मृतींना उजाळा दिला.'क्रिकेट कलेक्टिव पॉडकास्ट' वर ‘ती’आठवण सांगताना कर्स्टन यांनी गावसकर यांच्या निमंत्रणावरून मुलाखतीसाठी आलो होतो. गावसकर स्वत: कोच निवड पॅनलमध्ये होते. माझ्यापुढे माजी कोच ग्रेग चॅपेल यांचाच करार ठेवण्यात आला आणि अखेर मला हे पद मिळाले, अशी माहिती कर्स्टन यांनी दिली.‘टीम इंडियाचा कोच बनणार का’, अशी विचारणा करणारा गावसकर यांचा ई-मेल आला तेव्हा मला गंमत वाटली होती. मी पत्नीशी चर्चा केली तेव्हा ती म्हणाली, ‘त्यांनी चुकीच्या व्यक्तीला मेल पाठविला.’ कोचिंगचा मला कुठलाही अनुभव नव्हता. मुलाखतीसाठी भारतात आलो तेव्हा तत्कालीन कर्णधार अनिल कुंबळेची भेट झाली. तोदेखील माझ्या दावेदारीबाबत हसला. मुलाखतीसाठी पोहोचलो त्यावेळीदेखील कर्णधार या नात्याने ‘तुम्ही येथे कसे आलात? अशी विचारणा केली. मी म्हणालो,‘ कोचपदासाठी मुलाखत देण्यास आलो आहे.’ त्यावेळी कुठलाही अनुभव नसताना मी ही जबाबदारी सांभाळली आणि भारताच्या सर्वांत यशस्वी कोचमध्ये माझी गणना झाली,’ असे गॅरी यांनी म्हटले आहे. भारताने त्यांच्या कारकिर्दीत २००९ ला कसोटीत अव्वल स्थान गाठले शिवाय दोन वर्षानंतर विश्वचषकही जिंकला.गॅरी पुढे म्हणाले, ‘सध्याचे मुख्य कोच रवी शास्त्री यांनी पॅनलचे सदस्य म्हणून माहोल गमतीदार केला. अवघ्या सात मिनिटात माझी निवड करण्यात आली. बीसीसीआयचे पदाधिकारी पुढे बसले होते. सचिवांनी मला भारतीय क्रिकेटबाबत स्वत:चा दृष्टिकोन मांडण्याची सूचना केली. मी म्हणालो, ‘माझ्याकडे काहीही नाही. कुणी मला अशी तयारी करण्याची माहिती दिली नव्हती.’ (वृत्तसंस्था)शास्त्री यांनी केला होता हा प्रश्न...रवी शास्त्री यांनी मला, ‘द. आफ्रिका संघाचा सदस्य म्हणून तुम्ही भारताला हरविण्यासाठी काय करायचे,’ हा प्रश्न केला होता. मुलाखतीत हशा पिकवण्यासाठी हा प्रश्न योग्य होता. मी दोन-तीन मिनिटात उत्तर दिले मात्र भारताविरुद्ध सामन्याच्यावेळी अमलात आणणाऱ्या डावपेचांचा मात्र मी उलगडा केला नाही,’ असे कर्स्टन म्हणाले.ही मुलाखत सात मिनिटे चालली. तिसºया मिनिटाला बोर्डाच्या सचिवांनी करार माझ्याकडे सरकवला. जो करार पाहिला त्यावर मावळते कोच ग्रेग चॅपेल यांचे नाव होते. मी करार हातात घेत स्वत:चे नाव पहिल्या पानावर शोधू लागलो. नाव दिसले नाही त्यामुळे मी तो करार परत करत माझे नाव यात दिसत नाही, अशी विचारणा केली. सचिवांनी स्वत:च्या खिशातून पेन काढला आणि चॅपेल यांच्या नावावर फुली मारून त्यांनी माझे नाव लिहिले होते.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- अवघ्या सात मिनिटांत झालो टीम इंडियाचा कोच- गॅरी कर्स्टन
अवघ्या सात मिनिटांत झालो टीम इंडियाचा कोच- गॅरी कर्स्टन
सुनील गावसकर यांनी बजावली मोलाची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 1:25 AM