Join us  

राहुल संघात आला तरी रोहितसोबत 'या' फलंदाजालाच सलामीला पाठवा- गौतम गंभीर

टी२० वर्ल्डकपचा विचार करून गंभीरने व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 8:07 PM

Open in App

Rohit Sharma Team India: IPL 2022च्या महालिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या इशान किशनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. इशान किशनने दोन सामन्यांत ११० धावा करत फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. तशातच टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने इशान किशनला टी२० विश्वचषक प्लॅनमध्ये समाविष्ट करावे, असा सल्ला संघ व्यवस्थापन आणि कर्णधार रोहित शर्माला दिला आहे.

"मला वाटते की इशान किशन निर्भिडपणे खेळतो. टी-२० क्रिकेटमध्ये असा अँटीट्यूड खूप महत्त्वाचा आहे. पण जेव्हा केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली संघात पुनरागमन करतील, तेव्हा टीम इंडिया इशानला संधी देईल का हा प्रश्न आहे. मला वाटतं की इशान किशनने धावा केल्या की नाही हे पाहण्यापेक्षा तो संघासाठी निर्भयपणे खेळतो हे पाहिलं पाहिजे. संघ व्यवस्थापनाने रोहित-इशानला सलामीला पाठवायला हवे आणि लोकेश राहुलला मधल्या फळीत फलंदाजी आणावे", असा सल्ला गंभीरने दिला.

"इशान किशन ऑस्ट्रेलियन परिस्थितीत चांगला सिद्ध होईल. तो पुल शॉट चांगला खेळू शकतो. यंदाचा टी२० वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात आहे. त्यामुळे इशान किशन असाच खेळत राहिला तर त्याला टी२० विश्वचषकात नक्कीच संधी दिली जाऊ शकते", असेही गौतम गंभीरने नमूद केले.

विशेष म्हणजे, IPL 2022 च्या मेगालिलावात इशान किशनला मुंबई इंडियन्सने १५.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. इशान किशन मोसमातील सर्वात महागडा खेळाडू ठरला, पण फलंदाजीत तो काही विशेष करू शकला नाही. मुंबई इंडियन्सकडून खेळताना इशान किशनने ४१८ धावा केल्या आणि त्याच्या नावावर केवळ दोन अर्धशतकांची नोंद झाली. सध्या विराट कोहली, केएल राहुल आणि रोहित शर्मा सारखे वरिष्ठ खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेत विश्रांती घेत आहेत. अशा परिस्थितीत तरुणांना संधी मिळत आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकागौतम गंभीररोहित शर्माइशान किशन
Open in App