भारतीय क्रिकेट आता सुरक्षित हातात; रोहित शर्माची वन डे कर्णधारपदी निवड होताच गौतम गंभीरचे मोठं विधान 

वन डे संघाचा कर्णधार म्हणून रोहितनं १० सामन्यांत ७७.५७च्या सरासरीनं ५४३ धावा केल्या आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतानं १०पैकी ८ सामने जिंकले आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 03:38 PM2021-12-12T15:38:03+5:302021-12-12T15:40:08+5:30

whatsapp join usJoin us
Gautam Gambhir backs BCCI's decision to appoint Rohit Sharma as ODI captain; says Indian cricket in safe hands | भारतीय क्रिकेट आता सुरक्षित हातात; रोहित शर्माची वन डे कर्णधारपदी निवड होताच गौतम गंभीरचे मोठं विधान 

भारतीय क्रिकेट आता सुरक्षित हातात; रोहित शर्माची वन डे कर्णधारपदी निवड होताच गौतम गंभीरचे मोठं विधान 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताचा माजी सलामीवीर आणि समालोचक गौतम गंभीर ( Gautam Gambhir) यानं वन डे संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची ( Rohit Sharma) याची निवड करण्याच्या BCCIच्या निर्णयाचं समर्थन केलं. रोहितकडे आता ट्वेंटी-२० व वन डे संघाचे, तर विराट कोहलीकडे कसोटी संघाचे कर्णधारपद असणार आहे. पण, बीसीसीआयच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली आहे. ८ डिसेंबरला बीसीसीआय आणि निवड समितीनं रोहित शर्माची वन डे व ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली. लोकेश राहुल हा संघाचा उपकर्णधार असणार आहे. 

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रोहिततनं ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद स्वीकारले अन् पहिल्याच मालिकेत टीम इंडियानं न्यूझीलंडविरुद्धची मालिका ३-० अशी जिंकली. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयनं  वन डे संघाच्या कर्णधारपदावरून विराटला हटवले. बीसीसीआयला मर्यादित षटकांच्या संघांसाठी एकच कर्णधार हवा आहे. म्हणून रोहितकडे वन डे संघाचे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला गेला. गौतम गंभीरनं बीसीसीआयच्या या निर्णयाचं स्वागत केलं आणि रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आणखी चांगली कामगिरी करेल, असा विश्वासही त्यानं व्यक्त केला. 

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गंभीर म्हणाला,''दोन कर्णधार ही भारतीय क्रिकेटसाठी चांगली गोष्ट आहे. रोहितला आता मर्यादित षटकांच्या म्हणजेच वन डे व ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये स्वतःला घडवण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. कर्णधार म्हणून रोहित शर्मा भारतीय क्रिकेटसाठी आणखी चांगली कामगिरी करेल, असा विश्वास आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघ सुरक्षित हातात आहे. त्यानं आयपीएलची पाच जेतेपदं पटकावली आहेत. अन्य कर्णधारांच्या तुलनेत तो काहीतरी नक्की चांगलं करेल.''

तो पुढे म्हणाला,''त्याचवेळी त्याचा संयम आणि एकंदर स्वभाव प्रसंगांना चांगल्यारितिनं सामोरे जाण्यास पुरेसा आहे. तो खेळाडूंवर दडपण निर्माण करत नाही. तो स्वतः एक शांत स्वभागाचा माणूस आहे. त्याचा संपूर्ण संघालाच फायदा होणार आहे.'' वन डे संघाचा कर्णधार म्हणून रोहितनं १० सामन्यांत ७७.५७च्या सरासरीनं ५४३ धावा केल्या आहेत. त्यात दोन शतकांचा समावेश आहे. नाबाद २०८ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतानं १०पैकी ८ सामने जिंकले आहेत. 

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं ९५ वन डे सामन्यांत ६५ विजय मिळवले आहेत, तर २७ पराभव पत्करले आहेत. त्यानं कर्णधार म्हणून ७२.६५च्या सरासरीनं ५४४९ धावाही केल्या आहेत. 

Web Title: Gautam Gambhir backs BCCI's decision to appoint Rohit Sharma as ODI captain; says Indian cricket in safe hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.