"रोहित शर्माला टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघाचा कर्णधार न बनवल्यास, त्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट नसेल!"

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( Indian Premier League 2020) सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्मा ( Rohit Sharma) आघाडीवर आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: November 11, 2020 03:16 PM2020-11-11T15:16:12+5:302020-11-11T15:17:31+5:30

whatsapp join usJoin us
Gautam Gambhir believes it will be a "shame" if Rohit Sharma isn't considered for the full-time white-ball captaincy  | "रोहित शर्माला टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघाचा कर्णधार न बनवल्यास, त्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट नसेल!"

"रोहित शर्माला टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघाचा कर्णधार न बनवल्यास, त्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट नसेल!"

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( Indian Premier League 2020) सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्मा ( Rohit Sharma) आघाडीवर आहे. मागील ८ पर्वात रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) पाच जेतेपद नावावर केली. आयपीएलमध्ये सर्वाधिक ६ जेतेपदं रोहितच्या नावावर आहेत. त्यापैकी ५ जेतेपदं ही त्यानं कर्णधार म्हणून जिंकलेली आहेत. संघातील प्रत्येक खेळाडूवर पूर्णपणे विश्वास दाखवून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या रोहितकडे आता टीम इंडियाच्या मर्यादित षटकांच्या संघाचे नेतृत्व सोपवण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. आता तरी रोहितला टीम इंडियाच्या व्हाईट बॉल संघाचे कर्णधार बनवा. तसं न केल्यास टीम इंडियाचे मोठे नुकसान होईल, असे मत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) यानं व्यक्त केलं.

रोहितला मर्यादित षटकाच्या संघाचा कर्णधार न केल्यास, ती टीम इंडियासाठी लाजीरवाणी गोष्ट आणि भारतीय क्रिकेटचं दुर्भाग्य असेल, असेही गंभीर म्हणाला. ESPNcricinfo's T20 Time Outशी बोलताना गंभीरनं हे सडेतोड मत मांडले. ट्रेंट बोल्टनं ४ षटकांत ३० धावा देत ३ विकेट्स घेताना दिल्ली कॅपिटल्सला २० षटकांत ७ बाद १५६ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) अर्धशतकाच्या जोरावर MIनं MIनं ५ विकेट्स राखून दिल्ली कॅपिटल्सवर ( Delhi Capitals) सहज विजय मिळवला. रोहितनं ६८ धावांची धमाकेदार खेळ केला. BCCI नं मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्ससह इतरांना दिलं मोठं सरप्राईज!

गंभीर म्हणाला,''रोहित टीम इंडियाचा कर्णधार न झाल्यास, ते संघाचे नुकसान असेल, रोहितचे नाही. संघातील खेळाडूंच्या तोडीचा कर्णधार असतो आणि त्या मताशी मी सहमत आहे, परंतु कोणता कर्णधार चांगला, कोणता वाईट हे कसे ठरवले जाते? रोहितच्या नेतृत्वाखाली संघानं पाच आयपीएल जेतेपदं जिंकली आहेत.'

तो पुढे म्हणाला,''आपण नेहमी म्हणतो की महेंद्रसिंग धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. का, तर त्यानं दोन वर्ल्ड कप व तीन आयपीएल जिंकलेत म्हणून? रोहितनं पाच आयपीएल जेतेपद जिंकली आहेत आणि या स्पर्धेतील तो सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्यामुळेच त्याला टीम इंडियाच्या व्हाईट बॉल किंवा फक्त ट्वेंटी-20 संघाचा कर्णधार न केल्यास, यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट नसेल.'' IPL 2021 Auction बाबत मोठी बातमी; संघ संख्याही वाढवणार, अहमदाबाद शर्यतीत?

यावेळी गंभीरनं हेही स्पष्ट केलं की, विराट कोहलीचे नेतृत्व कमकुवत आहे, असे म्हणायचे नाही, परंतु ट्वेंटी-20 संघासाठी रोहित योग्य कर्णधार आहे.   
 

 

Web Title: Gautam Gambhir believes it will be a "shame" if Rohit Sharma isn't considered for the full-time white-ball captaincy 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.