धोनी अन् गांगुलीपेक्षा कॅप्टन कोहली वेगळा; गंभीरनं सांगितलं कारण  

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटीत यजमानांनी एक डाव व 137 धावांनी विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 10:12 AM2019-10-14T10:12:35+5:302019-10-14T10:13:02+5:30

whatsapp join usJoin us
Gautam Gambhir explains what sets Virat Kohli apart from MS Dhoni and Sourav Ganguly as captain | धोनी अन् गांगुलीपेक्षा कॅप्टन कोहली वेगळा; गंभीरनं सांगितलं कारण  

धोनी अन् गांगुलीपेक्षा कॅप्टन कोहली वेगळा; गंभीरनं सांगितलं कारण  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटीत यजमानांनी एक डाव व 137 धावांनी विजय मिळवला. या निकालासह कर्णधार विराट कोहलीनं विश्वविक्रमाची नोंद केली. भारतानं मायदेशात सलग 11 कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. शिवाय कोहलीनं फॉलोऑन देऊन 8व्यांदा सामना जिंकून माजी कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रमही मोडला. या विजयासह भारतीय संघाने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 200 गुणांसह अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत केली. भारताने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.  

कोहलीच्या या विक्रमी कामगिरीचे कौतुक करताना महेंद्रसिंग धोनी आणि सौरव गांगुली यांच्यापेक्षा कोहली वेगळा का आहे, ते माजी सलामीवीर गौतम गंभीरने सांगितले. तो म्हणाला,''तुम्ही पराभवाला घाबरलात, तर कधीच विजय मिळवू शकत नाही आणि कोहली कधीच पराभवाला घाबरला नाही. आपण सर्व सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि महेंद्रसिंग धोनी यांच्याबद्दल बोलत आलोय, परंतु विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ परदेशातही विजय मिळवू लागला आहे.''


कर्णधार म्हणून कोहलीचा 50वा सामना होता. कर्णधार म्हणून पहिल्या पन्नास सामन्यांत सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये कोहलीनं तिसरे स्थान पटकावले आहे. या विक्रमात ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह वॉ ( 37 विजय) आणि रिकी पाँटिंग ( 35) अनुक्रम पहिल्या व दुसऱ्या स्थानी आहेत. कोहलीनं 50 सामन्यांत 30 विजय मिळवले आहेत. या सामन्यात द्विशतकी खेळी करणाऱ्या कोहलीला मॅन ऑफ दी मॅचच्या पुरस्कारानं गौरविण्यात आलं. 


कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये कोहलीनं चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. सचिन तेंडुलकर ( 14), राहुल द्रविड ( 11) आणि अनिल कुंबळे ( 10) अव्वल तीन स्थानी आहेत. कोहलीचा हा 9वा मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार ठरला. कपिल देव व वीरेंद्र सेहवाग यांनी प्रत्येकी 8 वेळा हा मान पटकावला आहे. कर्णधार म्हणून आफ्रिकेविरुद्ध मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार जिंकणारा कोहली हा सचिन तेंडुलकर ( 2000) याच्यानंतर पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. 

Web Title: Gautam Gambhir explains what sets Virat Kohli apart from MS Dhoni and Sourav Ganguly as captain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.