गौतम गंभीरमुळे भारतीय क्रिकेटपटूच्या सासूचे प्राण वाचले; खेळाडूने आभार मानले

भारताचा माजी सलामीवीर आणि लखनौ सुपर जायंट्स संघाचा मेंटॉर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) सध्या विराट कोहलीसोबतच्या वादामुळे चर्चेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 04:04 PM2023-05-09T16:04:29+5:302023-05-09T16:05:35+5:30

whatsapp join usJoin us
Gautam Gambhir financially helped Rahul Sharma whose mother in law was in critical condition.  | गौतम गंभीरमुळे भारतीय क्रिकेटपटूच्या सासूचे प्राण वाचले; खेळाडूने आभार मानले

गौतम गंभीरमुळे भारतीय क्रिकेटपटूच्या सासूचे प्राण वाचले; खेळाडूने आभार मानले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताचा माजी सलामीवीर आणि लखनौ सुपर जायंट्स संघाचा मेंटॉर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) सध्या विराट कोहलीसोबतच्या वादामुळे चर्चेत आहे. LSG vs RCB सामन्यानंतर विराट व गौतम यांच्यात शाब्दिक राडा झाला होता आणि नेटिझन्सनी गौतमवर टीका केली होती. पण, काही लोकं गौतमच्या बाजूनेही उभी राहिली. आता पुन्हा एकदा गौतम चर्चेत आला आहे. पूर्व दिल्ली मतदारसंघातून खासदार असलेल्या गौतम गंभीरने भारताचा माजी सहकारी राहुल शर्माला  ( Rahul Sharma) मदत केली आहे. राहुलच्या सासूला नुकताच ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे मृत्यूशी संघर्ष करावा लागला होता आणि त्यांच्या उपचारासाठी सर्वोत्कृष्ट न्यूरोलॉजिस्ट आणि हॉस्पिटलची सूचना राहुलला देण्यात आली होती. अशा वेळी गौतम गंभीर त्याच्या मदतीला उभा राहिला.


राहुल शर्मा २०११ ते २०१२ पर्यंत भारताकडून खेळला आणि चार वन डे व दोन ट्वेंटी-२० सामने खेळला.  शर्माने त्याच्या ट्विटर हँडलवर स्टोरी शेअर केली, त्याने गंभीरचे वेळेवर केलेल्या मदतीबद्दल आभार मानले. शर्मा म्हणाला की, गंभीर सध्या लखनौ सुपर जायंट्स संघासोबत मार्गदर्शक म्हणून काम करत आहे. त्याने माझ्या सासूच्या उपचारासाठी एक चांगला डॉक्टर आणि हॉस्पिटल शोधण्यात मदत केली. ही घटना गेल्या महिन्यात घडली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांच्या पत्नीची आई आता पूर्णपणे बरी आहे. 



 गेल्या आठवड्यात LSG आणि RCB यांच्यातील IPL 2023 च्या सामन्यादरम्यान गंभीर आणि कोहली यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती . या घटनेने क्रिकेट जगतात खूप खळबळ उडवून दिली. गंभीर आणि कोहली या दोघांवरही चाहत्यांनी क्रिकेटच्या मैदानावर चुकीच्या वागणुकीबद्दल टीका केली होती. मात्र, राहुल शर्माच्या सासूसाठी गंभीरने केलेली मदत पाहून नेटिझन्सची मनं जिंकली आहेत. नेटिझन्स २०११च्या विश्वचषक विजेत्या स्टारचे त्याच्या माजी सहकाऱ्यासाठी हृदयस्पर्शी कृत्याबद्दल कौतुक करत आहेत. 

Web Title: Gautam Gambhir financially helped Rahul Sharma whose mother in law was in critical condition. 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.