Join us  

Gautam Gambhir, Team India: टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होताच गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला- "माझी ओळख..."

Gautam Gambhir head Coach Team India: राहुल द्रविडच्या जागी गौतम गंभीरची हेड कोच म्हणून आज झाली नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 11:43 PM

Open in App

Gautam Gambhir head Coach Team India: भारतीय संघाने टी२० विश्वचषक जिंकून कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी विराट कोहली आणि अष्टपैलू रवींद्र जाडेजा या त्रिकुटाला टी२० मधून निरोप दिला. यासोबत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचाही कोच म्हणून हा शेवटचा सामना होता. द्रविड यांच्यानंतर हे पद कोण सांभाळणार या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला. भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याला ही जबाबदारी सोपवण्यात आली. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विटरवरून या संदर्भातील अधिकृत घोषणा केली. या घोषणेनंतर गौतम गंभीरने भारताच्या तिरंग्याचा फोटो पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

"भारत ही माझी ओळख आहे. माझ्या देशाची सेवा करण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी भाग्यच आहे. खेळाडू म्हणून खेळल्यानंतर आता कोचच्या भूमिकेत मला पुन्हा एकदा देशसेवा करण्यासाठी संधी मिळाली हा माझा सन्मान आहे. आता मी खेळाडूची नव्हे तर कोचची टोपी घालून ड्रेसिंग रुममध्ये दिसेन. पण टीम इंडियाचा विजय आणि देशाला गर्व वाटावी अशी कामगिरी हेच माझे पुन्हा एकदा लक्ष्य असेल. भारतीय क्रिकेट संघाच्या खांद्यावर नेहमीच १४० कोटी भारतीयांची स्वप्ने असतात. ही स्वप्ने पूर्ण करण्याचा मी संपूर्ण प्रयत्न करेन", अशा भावना गंभीरने टीम इंडियाच्या हेड कोच पदी नियुक्ती झाल्यावर व्यक्त केल्या.

दरम्यान, २००७ आणि २०११ च्या टीम इंडियाच्या विश्वविजेतेपदांमध्ये गंभीरने मोलाची भूमिका बजावली होती. दोनही फायनलमध्ये गंभीरने सर्वाधिक धावा केल्या होत्या. आता गौतम गंभीर टीम इंडियाच्या खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहे. टी२० विश्वचषकानंतर राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्याने त्याआधीच बीसीसीआयकडून नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू झाला होता. त्यात गौतम गंभीरचे नाव आघाडीवर होते. तसेच, भाजपाकडून २०१९ ते २०२४ या काळात खासदार असलेला गंभीर, यावेळची लोकसभा निवडणुक लढला नव्हता. कोलकाता संघाला मेंटॉर म्हणून IPL 2024 जिंकवून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर आज अखेर त्याच्या नावाच अधिकृत घोषणा झाली.

टॅग्स :गौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघजय शाहबीसीसीआयराहुल द्रविड