नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचे बिगुल वाजले आहे. सुपर-१२ मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ८ संघामध्ये लढत पार पडली. आतापर्यंत श्रीलंका, नेदरलॅंड आणि आयर्लंड या ३ संघांनी विश्वचषकाचे तिकिट मिळवले आहे. लक्षणीय बाब म्हणजे २वेळचा विश्वचॅम्पियन वेस्ट इंडिजचा संघ विश्वचषकातून बाहेर झाला आहे. भारतीय संघाचा या स्पर्धेतील पहिला सामना आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध रविवारी होणार आहे. २३ ऑक्टोबर रोजी ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर हा रनसंग्राम होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानशी मुकाबला करणार आहे. अशातच भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यासाठी त्याची प्लेइंग इलेव्हन निवडली आहे.
दरम्यान, गंभीरने निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनबाबत कर्णधार रोहित शर्मा देखील विचार करू शकत नाही. मात्र विश्वविजेत्या खेळाडूने त्याचे काम सोपे करण्याचा प्रयत्न केला आहे. झी हिंदी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गंभीरने प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. त्याने दिनेश कार्तिकच्या जागी रिषभ पंतला संघात स्थान दिले आहे. मागील काही दिवसांपासून कार्तिक शानदार लयनुसार खेळत आहे, त्यामुळे क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी यष्टीरक्षक खेळाडू खेळवायचा असेल तर कार्तिकला संधी द्यायला हवी असे म्हटले होते. मात्र गंभीरने रिषभ पंतवर अधिक विश्वास दाखवला आहे.
गौतम गंभीरची प्लेइंग XI
रोहित शर्मा (कर्णधार, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, अक्षर पटेल, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग/भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.
गोलंदाजीबाबत सल्ला देताना गंभीरने म्हटले, फिरकीपटू म्हणून प्रत्येक सामना खेळण्यासाठी अक्षर पटेल सज्ज आहे. मात्र गंभीरने आर अश्विनच्या जागी युजवेंद्र चहलला अधिक प्राधान्य दिले आहे. अलीकडच्या काळात चहलने खेळपट्टीवर संघर्ष करून भारतीय संघाच्या फिरकीची धुरा सांभाळली आहे. खरं आतापर्यंत राउंड फेरीतील ३ संघानी विश्वचषकाचे तिकिट मिळवले आहे. यामध्ये आशियाई चॅम्पियन श्रीलंका, नेदरलॅंड आणि आयर्लंडच्या संघाचा समावेश आहे. तर झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड यांच्यात होणाऱ्या सामन्यानंतर चौथा संघाचे चित्र स्पष्ट होईल. झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड यांच्यात विजयी होणारा संघ ६ नोव्हेंबर रोजी भारताविरूद्ध सामना खेळेल.
टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई.
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक
२३ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, १.३० वाजल्यापासून, मेलबर्न
२७ ऑक्टोबर - भारत वि. नेदरलॅंड, १२.३० वाजल्यापासून, सिडनी
३० ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, ४.३० वाजल्यापासून, पर्थ
२ नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, १.३० वाजल्यापासून, ॲडलेड
६ नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, १.३० वाजल्यापासून, मेलबर्न
१३ नोव्हेंबरला अंतिम सामना
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Gautam Gambhir has selected the playing XI for the match against Pakistan and he has named Rishabh Pant instead of Dinesh Karthik
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.