भारतीय संघाचा माजी सलामीवर आणि भाजपाचा खासदार गौतम गंभीर याच्या नवी दिल्ली येथील घरी कोरोना रुग्ण आढळला आहे. गंभीरनं सोशल मीडियावरून ही माहिती देताना स्वतः सेल्फ आयसोलेट झाल्याचेही सांगितले. गंभीरची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्याचा रिपोर्टची प्रतीक्षा आहे.
''घरी कोरोना रुग्ण आढळल्यानं मी स्वतःला सेल्फ आयसोलेट केलं आहे आणि रिपोर्टची वाट पाहत आहे. सर्वांनी नियमांचं काटेकोर पालन करा आणि कोरोनाला हलक्यात घेऊ नका, असे आवाहन मी सर्वांना करतो. सुरक्षित राहा,''असे गंभीरनं ट्विट केलं. 2018मध्ये गंभीरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि त्यानंतर तो राजकारणात सक्रीय आहे.
गौतम गंभीरनं ५८ कसोटी, १४७ वन डे व ३७ ट्वेंटी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्याच्या नावावर कसोटी, वन डे व ट्वेंटी-20त अनुक्रमे ४१५४, ५२३८ आणि ९३२ धावा आहेत. त्यानं एकूण २० आंतरराष्ट्रीय शतकं झळकावली आहेत.
Web Title: Gautam Gambhir isolates himself after COVID-19 case reported at his home
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.