Join us  

Gautam Gambhir KL Rahul, IPL 2022: RCB विरूद्ध पराभूत झाल्यानंतर राहुल, गंभीर यांच्या Instagram पोस्ट चर्चेत; पाहा काय म्हणाले...

लखनौच्या स्वप्नवत प्रवासाला RCB ने लावला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 8:01 PM

Open in App

Gautam Gambhir KL Rahul : IPL 2022 मध्ये प्रथमच खेळत असलेल्या लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाने प्ले-ऑफचे तिकीट मिळवले होते, पण एलिमिनेटर सामन्यात त्यांचा प्रवास संपुष्टात आला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने (RCB) एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा 14 धावांनी पराभव केला. या पराभवानंतर संघाचा मार्गदर्शक (मेंटॉर) गौतम गंभीर आणि कर्णधार केएल राहुल यांनी पराभव स्वीकारला, पण त्याच वेळी आम्ही पुढील वर्षी आम्ही जोशात पुनरागमन करू, असा विश्वास व्यक्त केला.

लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर गौतम गंभीर याने त्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्यासोबतच त्याने कॅप्शनही लिहिले की आज आमच्या संघाला नशिबाची म्हणावी तशी साथ मिळाली नाही. पण आमच्या संघासाठी ही स्पर्धा म्हणजे एक चांगला अनुभव होता. आम्ही पुन्हा नक्कीच भेटू आणि पुढच्या वेळी आम्ही दमदार पुनरागमन करू, असा संदेश त्याने साऱ्यांना दिला.

गौतम गंभीरशिवाय कर्णधार केएल राहुलनेही इंस्टाग्रामवर चाहत्यांचे आभार मानले. कॅप्टन केएल राहुलने लिहिले, 'आम्ही खूप चांगली कामगिरी केली. यातून मला नक्कीच प्रेरणा मिळाली. हा हंगाम संपला. आम्हाला पाहिजे तसं घडलं नाही. पण आम्ही शेवटपर्यंत आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले. लखनौ सुपर जायंट्स परिवार, सपोर्ट स्टाफ, टीम मॅनेजमेंट आणि डॉ. संजीव गोयंका यांचे आभार. आमच्या चाहत्यांचेही आभार ज्यांनी पहिल्याच सत्रात आमच्यावर खूप प्रेम केले', अशी पोस्ट राहुलने केली.

टॅग्स :आयपीएल २०२२लोकेश राहुलगौतम गंभीरलखनौ सुपर जायंट्स
Open in App