Join us  

IND vs SL: "मला त्या गोष्टीचा अजूनही पश्चात्ताप होतो.."; Suryakumar Yadav बद्दल हे काय बोलून गेला Gautam Gambhir ?

Gautam Gambhir Suryakumar Yadav Team India, IND vs SL T20: गंभीर-सूर्या जोडीसाठी आजचा दिवस खास आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 4:47 PM

Open in App

Gautam Gambhir Suryakumar Yadav Team India, IND vs SL T20: भारतीय संघ आजपासून श्रीलंकेत ३ टी२० मालिका खेळणार आहे. पल्लेकलच्या मैदानात २७, २८ आणि ३० जुलैला हे टी२० सामने रंगणार आहेत. ही मालिका भारतीय क्रिकेटसाठी खास आहे. गौतम गंभीर या मालिकेतून मुख्य प्रशिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करत आहे तर रोहितच्या टी२० निवृत्तीनंतर कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवचाही हा पहिलाच सामना आहे. त्यामुळे गंभीर-सूर्या जोडीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. पण या सामन्याआधी गंभीरने सूर्याबद्दल एक मोठं विधान केलं आहे.

सूर्यकुमार यादव IPL मध्ये २०१४ ते २०१७ KKR च्या संघाकडून खेळत होता. त्यावेळी गंभीर संघाचा कर्णधार होता, पण त्या कालावधीत सूर्यकुमारला संघाच्या प्लेइंग ११ मध्ये फारशी संधी मिळाली नाही. त्यावेळेबद्दल बोलताना, गौतम गंभीरने त्याला होत असलेल्या पश्चात्तापाबद्दल विधान केले. "प्रत्येक खेळाडूला सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन देणे हे संघाच्या कर्णधाराचे काम असते. मी सात वर्षे कोलकाता संघाचा कर्णधार होतो. त्यात मला एकच पश्चात्ताप होतो की मला सूर्यकुमारच्या टॅलेंटचा माझ्या संघासाठी पूर्णपणे वापर करून घेता आला नाही," असे गंभीर म्हणाला.

"सूर्याला त्यावेळी संघात स्थान न देण्यामागेही काही वेगळी कारणं होती. संघाच्या कॉम्बिनेशन नुसार मला प्लेइंग ११ खेळाडू निवडावी लागत होती. तिसऱ्या क्रमांकासाठी तुम्ही केवळ एकच फलंदाज खेळवू शकता कारण तुम्हाला इतर १० जागांचाही विचार करायचा असतो. सूर्यकुमार यादव जर त्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर खेळायला उतरला असता तर तो खूप जास्त प्रभावी ठरला असता. पण त्याने सातव्या नंबरवर खेळूनही दमदार कामगिरी करून दाखवली" असेही गंभीरने नमूद केले.

दरम्यान, सामन्याआधीच्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमारला गंभीरच्या या पश्चात्तापाबाबतच्या वाक्यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर सूर्यकुमारने मजेशीर उत्तर दिले. "त्यावेळी माझ्या टॅलेंटचा पूर्ण वापर करता आला नसला तरी आता त्या गोष्टीचा पूर्ण वापर करून घेऊया," असे सूर्यकुमार यादव म्हणाला.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकासूर्यकुमार अशोक यादवगौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ