कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अनेक संस्था आणि क्रीडापटू पुढे आले आहेत. लॉकडाऊनच्या काळात आपल्या घरी काम करणाऱ्या लोकांची काळजी घेण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येकाला केले. अशात भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि भाजपा खासदार गौतम गंभीरच्या घरी एक दुःखद घटना घडली. पण, या काळात गंभीरनं माणुसकी जपली.
गौतम गंभीरच्या घरी घरकाम करणाऱ्या महिलेचे नुकतेच निधन झाले. याची माहिती गंभीरनं ट्विटरवरून दिली. इतकेच नाही, तर गंभीरनं घरकाम करणाऱ्या महिलेचे स्वतः अंत्यसंस्कार केले. 'आज तक' च्या वृत्तानुसार या महिलेचे नाव सरस्वती पात्रा होते आणि ती ओडिशाची होती. सरस्वतीला मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. तिला काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 21 एप्रिलला तिचे निधन झाले.
गंभीरनं ट्विट केलं की,''ती आमच्या कुटुंबाची सदस्य होती आणि तिचे अंत्यसंस्कार करणे ही माझी जबाबदारी होती. जात, धर्म, धर्म किंवा सामाजिक प्रतिष्ठेचा विचार मी करत नाही. चांगला समाज निर्माण करण्याचा हाच मार्ग आहे.. ओम शांती.'' कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी गंभीरनं नवी दिल्ली सरकारला 50 लाखांची मदत केली. शिवाय त्यानं दोन वर्षांचा पगार पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिला आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या...
सचिननं 26/11 हल्ल्यातील शहिदांना वाहिली होती अनोखी श्रद्धांजली...
अंजलीला 'डेट' करण्यासाठी सचिन तेंडुलकर सरदार बनला, अन्...
विराट कोहली, सौरव गांगुलीसह क्रिकेट विश्वाकडून 'मास्टर ब्लास्टर'ला शुभेच्छा
2007मध्ये निवृत्ती घेणार होता सचिन तेंडुलकर, पण परदेशातून फोन आला अन्...