Join us  

IND vs SL ODI: श्रीलंकेविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी गौतम गंभीरने सांगितला प्लॅन; केएल राहुलला दाखवला बाहेरचा रस्ता

भारतीय संघ नववर्षातील आपल्या अभियानाची सुरूवात श्रीलंकेविरूद्धच्या मायदेशातील मालिकेतून करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2023 12:22 PM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघ नववर्षातील आपल्या अभियानाची सुरूवात श्रीलंकेविरूद्धच्या मायदेशातील मालिकेतून करणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 ट्वेंटी-20 आणि 3 वन डे सामने खेळवले जाणार आहेत. आगामी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. यावरूनच भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने श्रीलंकेविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी प्लेइंग इलेव्हन निवडली असून लोकेश राहुलला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. भारतीय संघ 3 जानेवारीपासून हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात ट्वेंटी-20 मालिका खेळणार आहे. 

केएल राहुलला दाखवला बाहेरचा रस्ता 

दरम्यान, रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी सलामी द्यावी असे गौतम गंभीरने सूचवले. गौतम गंभीरने म्हटले, रोहितने वन डे मध्ये ईशान किशनसोबत सलामीवीर म्हणून खेळावे. भारतीय संघाची पहिली पसंती ईशान असली पाहिजे. 2023 च्या विश्वचषकात ईशानने रोहितसोबत डावाची सुरुवात करावी, असे गंभीरने स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना सांगितले. तसेच सलामीवीर म्हणून रोहित आणि ईशान किशन हेच असावेत. विराट 3, सूर्या 4 आणि श्रेयस पाचव्या क्रमांकावर खेळेल. कारण मागील दीड वर्षात तो शानदार कामगिरी करत आहे. तर सहाव्या क्रमांकावर हार्दिक पांड्याने खेळावे असे गंभीरने म्हटले. 

"मला आश्‍चर्य वाटत आहे की, आता आपण सलामीवीर फलंदाजांबद्दल भाष्य करत आहोत. मात्र, ईशानच्या द्विशतकी खेळीनंतर ही चर्चा संपली आहे. ईशान किशनशिवाय शुबमन गिलचीही वन डे मालिकेसाठी निवड झाली आहे. त्याने देखील अलीकडच्या काळात चांगली कामगिरीही केली आहे", असे गंभीरने अधिक म्हटले. 

श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी भारताचा ट्वेंटी-20 संघ - हार्दिक पांड्या (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

भारत विरूद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक 

  • 3 जानेवारी, मंगळवार - पहिला ट्वेंटी-20 सामना, मुंबई
  • 5 जानेवारी, गुरूवार - दुसरा ट्वेंटी-20 सामना, पुणे 
  • 7 जानेवारी, शनिवार - तिसरा ट्वेंटी-20 सामना, राजकोट 
  • 10 जानेवारी, मंगळवार, पहिला वन डे सामना, गुवाहटी
  • 12 जानेवारी, गुरूवार, दुसरा वन डे सामना, कोलकाता
  • 15 जानेवारी, रविवार, तिसरा वन डे सामना, त्रिवेंद्रम

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकागौतम गंभीरलोकेश राहुलइशान किशनभारतीय क्रिकेट संघ
Open in App