नवी दिल्ली : मोठ्या कालावधीपासून संपूर्ण जग ज्या क्षणाच्या प्रतीक्षेत होतं, तो क्षण अगदी जवळ आला आहे. कारण ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. स्पर्धेतील सलामीचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान १४ ऑक्टोबरला आमनेसामने असतील. या बहुचर्चित स्पर्धेचे साक्षीदार होण्यासाठी अवघं क्रिकेट विश्व सज्ज झालं आहे. माजी खेळाडू देखील आपापली मतं मांडत आहेत, विश्लेषण करून चाहत्यांचा उत्साह वाढवत आहेत. अशातच भारताच्या विश्वविजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांच्या अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधलं. त्यांनी DisneyPlusHS साठी जाहिरात करताना केलेला अभिनय गौतम गंभीरला भुरळ घालून गेला.
दरम्यान, कपिल देव यांच्या अभिनय कौशल्याचा दाखला देत गंभीरने त्यांचे खास शैलीत अभिनंदन केले. सोशल मीडियावर कपिल देव यांचा व्हिडीओ पोस्ट करत गंभीरने म्हटले, "पाजी तुम्ही खूप छान खेळलात... अभिनयाचा विश्वचषक देखील तुम्हीच जिंकाल. आता डिस्नी प्लस हॉटस्टार नेहमी लक्षात राहील कारण इथे ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक विनामूल्य आहे."
भारताला जग्गजेते बनवणारे कपिल देवकपिल देव यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली १९८३ मध्ये भारतीय संघाला विश्वचषक जिंकून दिला होता. कपिल देव यांची गणना जगातील महान क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. तर, २०११ मध्ये भारतीय संघाला विश्वचषकाची फायनल जिंकून देण्यात गौतम गंभीरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने अंतिम सामन्यात टीम इंडियासाठी ९७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. आता तब्बल १० वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतात आयसीसीची मोठी स्पर्धा होत आहे. त्यामुळे आगामी विश्वचषक जिंकून टीम इंडिया तमाम भारतीयांचं स्वप्न पूर्ण करणार का हे पाहण्याजोगे असेल.
विश्वचषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
विश्वचषकातील भारताचे सामने - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नईभारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्लीभारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबादभारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू