Join us  

WTC Final हरल्यानंतर गौतम गंभीरने भारताच्या जखमेवर मीठ चोळले; कपिल देव यांचं नाव वादात ओढले

WTC Final 2023: टीम इंडिया पुन्हा एकदा ICC ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरली. २०१३ पासून आतापर्यंत भारताला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 9:18 AM

Open in App

WTC Final 2023: टीम इंडिया पुन्हा एकदा ICC ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरली. २०१३ पासून आतापर्यंत भारताला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या फायनलमध्ये  (WTC Final ) ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी भारताचा २०९ धावांनी पराभव केला आणि प्रथमच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप काबीज केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाला सर्व बाजूंनी टीकेचा सामना करावा लागत आहे.   

 BCCI ने वर्ल्ड कप वेळापत्रकाचा ड्राफ्ट ICCला पाठवला; टीम इंडिया ९ शहरांत खेळणार

माजी सलामीवीर गौतम गंभीरने ( Gautam Gambhir) टीम इंडियावर निशाणा साधला असून आपल्या एका विधानाने नवा वाद निर्माण केला आहे. एका खासगी वाहिनीशी बोलताना गौतम गंभीर म्हणाला, ''मला वाटते की अनेक लोक हे बोलणार नाहीत, पण हे सत्य आहे आणि जगासमोर यायला हवे. आपल्या देशाला संघाची नाही, तर संघातील मोठ्या खेळाडूंची पूजा केली जाते. आम्ही खेळाडूला संघापेक्षा मोठा मानतो. इंग्लंड, न्यूझीलंड आणि इतर देशांमध्ये संघ मोठा आहे, एक खेळाडू नाही. हेच कारण आहे की आम्ही दीर्घकाळ आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलो नाही, कारण आम्हाला संघापेक्षा एका खेळाडूचे वेड आहे.''

गौतम गंभीर म्हणाला, "मोहिंदर अमरनाथ जी यांनी १९८३ च्या वर्ल्ड कपच्या सेमीफायनल आणि फायनलमध्ये MOM अवॉर्ड जिंकले होते, तुम्हाला हे माहित आहे का आणि १९८३ च्या WC ट्रॉफीसोबत त्यांचा फोटो कोणी पाहिला आहे का?, जेव्हा तुम्ही १९८३ बद्दल बोलता तेव्हा कपिल देव यांचा फोटो सगळीकडे ट्रॉफीसह दाखवला जातो. आपल्याकडे मीडिया, ब्रॉडकास्टर एक PRचं काम करतात.. ते संघापेक्षा एखाद्या खेळाडूला मोठं करण्याचं काम करतात.''

गौतम गंभीरने आपल्या वक्तव्यावरून विराट कोहली, रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांसारख्या बड्या खेळाडूंवर निशाणा साधला आहे. गौतम गंभीरनेही आपल्या वक्तव्याने नव्या वादाला जन्म दिला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा सारखे मोठे खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये फ्लॉप झाले आहेत. अंतिम सामन्यात कर्णधार रोहित शर्माला पहिल्या डावात केवळ १५ धावा आणि दुसऱ्या डावात ४३ धावा करता आल्या. विराट कोहलीला पहिल्या डावात १४ आणि दुसऱ्या डावात ४९ धावा करता आल्या. 

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धागौतम गंभीरकपिल देव
Open in App