नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकापूर्वी (T20 World Cup 2022) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या बलाढ्य संघाचा सामना करावा लागणार आहे. भारतीय संघ या संघांविरूद्ध ३-३ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेतील पहिला सामना २० सप्टेंबर रोजी मोहाली येथे होणार आहे. या टी-२० मालिकेतूनच भारतीय संघ आगामी टी-२० विश्वचषकाची तयारी करत आहे. आशिया चषकात झालेल्या पराभवानंतर भारताला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. अशातच भारतीय संघाच्या माजी खेळाडूने कर्णधार रोहित शर्माला मोठे आव्हान दिले आहे.
गौतम गंभीरचे मोठे विधान दरम्यान, गौतम गंभीर आणि रोहित शर्मा हे २००७ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य होते. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गंभीरने पाकिस्तानविरूद्ध ७५ धावा केल्या होत्या, तर रोहितने १६ चेंडूत ३० धावा केल्या होत्या. २० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेत भारत ऑस्ट्रेलियाला हरवू शकला नाही तर टी-२० विश्वचषक जिंकणे आपल्यासाठी कठीण जाईल, असे गौतम गंभीरने म्हटले. "मी हे आधीही बोललो आहे आणि पुन्हा सांगत आहे. २० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला हरवले नाही तर विश्वचषक विसरावा लागेल", स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना असा दावा गंभीरने केला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेकडे विश्वविजेता आणि जागतिक क्रमवारीत नंबर १ संघ यांच्यातील लढत म्हणून पाहिले जात आहे. साहजिकच ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढेल, असा विश्वास गंभीरनेही व्यक्त केला आहे. जर भारताने आपल्या धरतीवर ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली तर टी-२० विश्वचशक जिंकायला मदत होईल नाहीतर रोहित सेनेला मोठा संघर्ष करावा लागेल, असे गंभीरने अधिक म्हटले.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचे वेळापत्रक - २० सप्टेंबर- मोहाली, २३ सप्टेंबर - नागपूर आणि २५ सप्टेंबर- हैदराबाद
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न13 नोव्हेंबरला अंतिम सामना