Join us  

विराट, रोहित नाहीतर बाबर आझम यंदाचा विश्वचषक गाजवू शकतो; गौतम गंभीरचा दावा

पाच ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 3:37 PM

Open in App

ODI World Cup 2023 : पाच ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. आगामी स्पर्धेसाठी जवळपास सर्वच देशांनी आपल्या संघाची घोषणा केली आहे. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानने देखील १५ सदस्यीय संघ जाहीर केला. आगामी स्पर्धेबद्दल क्रिकेट विश्वातील जाणकार आपापली मतं मांडत आहेत. अशातच भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनेपाकिस्तानी कर्णधार बाबर आझमचे तोंडभरून कौतुक केले. आगामी वन डे विश्वचषकात तो कोणता खेळाडू असेल ज्यावर त्याची नजर असेल असे गंभीरला विचारले असताना त्याने विराट, रोहित नाहीतर पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमचे नाव घेतले. 

गौतम गंभीरने सांगितले की, बाबर आझमकडे त्याचे शॉट्स खेळण्यासाठी पूर्ण वेळ आहे, ज्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो. बाबर आझम हा भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केन विल्यमसन आणि इंग्लंडचा दिग्गज खेळाडू जो रूट यांच्याप्रमाणेच खतरनाक आहे. पण, मला वाटते की वन डे विश्वचषक बाबरच गाजवू शकतो. तो 'स्टार स्पोर्ट्स'वर बोलत होता. 

बाबर विश्वचषक गाजवू शकतो - गंभीर "पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा विश्वचषक गाजवू शकतो. मी असे अनेक खेळाडू पाहिले आहेत ज्यांच्याकडे फलंदाजीसाठी भरपूर वेळ आहे. मला वाटते की रोहित शर्मा, विराट कोहली, केन विल्यमसन आणि जो रूट आहेत, पण बाबर आझममध्ये एक वेगळीच क्षमता आहे", असेही गौतम गंभीरने सांगितले. 

विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघ - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, सॅम मीर, हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर, हसन अली आणि शाहीन आफ्रिदी.

राखीव खेळाडू - मोहम्मद हारिस, जमान खान, अबरार अहमद. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपगौतम गंभीरबाबर आजमपाकिस्तानविराट कोहलीरोहित शर्मा