Join us

"जिसकी मति और गति सत्य की हो,..."; KKR च्या विजयानंतर गौतम गंभीरची पोस्ट व्हायरल

KKR ने १० वर्षांचा आयपीएल जेतेपदाचा दुष्काळ संपवल्यानंतर गौतम गंभीरने प्रेरणादायी पोस्ट केली. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 13:15 IST

Open in App

कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चे जेतेपद नावावर केले. गौतम गंभीरची मेंटॉर म्हणून केलेली नियुक्ती KKR साठी फलदायी ठरली. श्रेययस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने जेतेपदाची ट्रॉफी उचलली. २०१२, २०१४ आणि २०२४ अशी तीन आयपीएल जेतेपदं KKR च्या नावावर झाली आहेत. २०१२ व २०१४ मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली KKR ने जेतेपद जिंकले होते आणि आता मेंटॉर म्हणून त्याने जेतेपद पटकावून विक्रम रचला. कर्णधार व मेंटॉर म्हणून आयपीएल जेतेपद पटकावणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. KKR ने १० वर्षांचा आयपीएल जेतेपदाचा दुष्काळ संपवल्यानंतर गौतम गंभीरने प्रेरणादायी पोस्ट केली. 

SRH ने फायनलमध्ये पूर्णपणे लोटांगण घातले. कर्णधार पॅट कमिन्स ( २४) हा SRH साठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. मिचेल स्टार्क ( २-१४), हर्षित राणा ( २-२४) व आंद्रे रसेल ( ३-१९) यांच्या माऱ्यासमोर SRH चा पूर्ण संघ १८.३ षटकांत ११३ धावांत तंबूत परतला. प्रत्युत्तरात, वेंकटेश अय्यर आणि  रहमनुल्लाह गुरबाज ( ३९) यांनी ४५ चेंडूंत ९१ धावा जोडून विजय निश्चित केला. वेंकटेश २६ चेंडूत ४ चौकार व ३ षटकारांसह ५२धावांवर नाबाद राहिला आणि कोलकातान १०.३ षटकांत २ बाद ११४ धावा करून सामना जिंकला. 

विजयानंतर गौतम गंभीरने ट्विट केलं की, “जिसकी मति और गति सत्य की हो, उसका रथ आज भी श्री कृष्ण चलाते हैं”  

टॅग्स :आयपीएल २०२४कोलकाता नाईट रायडर्ससनरायझर्स हैदराबादगौतम गंभीर