मुंबई : विराट कोहली हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार असल्याचे आकडे सांगत असले तरी भारताचा माजी सलामीवीर आणि भाजपाचा खासदार गौतम गंभीर याला तसे वाटत नाही. परिपक्व कर्णधार बनण्यासाठी कोहलीला आणखी बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. शिवाय ऑस्ट्रेलियात कसोटी व वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रमही केला. नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यातही त्याच्या नेतृत्वाखाली भारताने निर्भेळ यश मिळवले.
गंभीरने यावेळी रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाचा कर्णधार म्हणून कोहली अपयशी ठरला, याकडेही लक्ष वेधले.''रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांनी अनुक्रमे मुंबई इंडियन्स आमि चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व सांभाळताना जे यश मिळवून दिले, तसे कोहलीला जमलेले नाही. यांची तुलना तुन्ही रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाशी कराल, तर तुम्हाला वस्तुस्थितीची जाण होईल,'' असेही गंभीर म्हणाला. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून मान मिळवणाऱ्या कोहलीला आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-20 मालिका जिंकण्याचे लक्ष्य खुणावत आहे.
IPL : एकदी जेतेपद न पटकावलेल्या आरसीबीचा कर्णधार बदलणार?नवी दिल्ली, आयपीएल : कर्णधार विराट कोहली, ख्रिस गेल, एबी डी'व्हिलियर्स ही क्रिकेट जगतातील मान्यवर फलंदाजांची त्रिमूर्ती आरसीबीकडे आहे. पण आरसीबीला अजून एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता आलेले नाही. आतापर्यंत संघाचे नेतृत्व कोहलीकडेच आहे, पण कोहलीला आरसीबीचे जेतेपद पटकावण्यात अपयश आले आहे. त्यामुळे कोहलीच्या जागी जर कोणी दुसऱ्या खेळाडूकडे संघाचे न्तृत्व सोपवले तर जेतेपद पटकावता येईल का, याचा विचार आरसीबीचे संघ व्यवस्थापन करत आहे. आरसीबीच्या संचालकपदी न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माइक हेसन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ते म्हणाले की, " आतापर्यंत आरसीबीच्या कर्णधारपदी कोहली आहे. आतापर्यंत आरसीबीला एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही. पण कोहलीचे संघावर चांगले नियंत्रण आहे. तो गेल्या काही चुकांमधून शिकल्याचेही पाहायला मिळाले आहे. पण सध्या तरी संघात आम्हाला नेतृत्व बदल करायचा नाही. जेव्हा आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही तो निर्णय घेऊ. "