Join us  

Gautam Gambhir plan Team India, IND vs SL: गौतम गंभीर श्रीलंकेत करणार नवा प्रयोग? जाणून घ्या, काय आहे टीम इंडियाचा 'KKR-सुनील नारायण' प्लॅन!

Gautam Gambhir plan Team India, IND vs SL: २७ जुलैपासून टीम इंडियाची श्रीलंकेविरूद्ध ३ सामन्यांची टी२० मालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 4:54 PM

Open in App

Gautam Gambhir plan Team India, IND vs SL: भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका आणि त्यानंतर ३ वन डे सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे. भारतीय संघ २७ जुलैपासून या दौऱ्याला सुरुवात करेल आणि आधी टी२० मालिकेला सुरुवात होईल. भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ सामन्यांची टी२० मालिका खेळवली संध्याकाळी ७ वाजता पल्लेकल येथील मैदानावर खेळवली जाणार आहे. या मालिकेतून गौतम गंभीर प्रशिक्षकपदाची सुरुवात करणार आहे. त्यामुळे भारतीय संघदेखील वेगळ्या मानसिकतेत दिसेल. तशातच आता गौतम गंभीरने एक वेगळाच प्लॅन आखला असून त्याला 'KKR-सुनील नारायण प्लॅन' येऊ शकेल.

गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्ससाठी जशी रणनीती आखली होती, तसाच काहीसा प्लॅन गंभीरने टीम इंडियासाठीही आखल्याचे बोलले जात आहे. श्रीलंकेतील नेट प्रक्टिस सेशननुसार, गौतम गंभीरला एक असा खेळाडू सापडला आहे जो टीम इंडियामध्ये अशी जबाबदारी पार पाडेल, जशी कोलकातासाठी सुनील नारायण खेळतो. क्रीजवर जाऊन केवळ षटकार आणि चौकार मारण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल. हा खेळाडू म्हणजे अष्टपैलू फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर.

'KKR-सुनील नारायण' प्लॅन!

पल्लेकलमधील सराव सेशनमधून मिळालेल्या वृत्तानुसार, गौतम गंभीरने वॉशिंग्टन सुंदरला हार्ड हिटिंगची म्हणजे फटकेबाज फलंदाजीची भूमिका दिली आहे. या खेळाडूला सलग दोन सराव सत्रांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी देण्यात आले. वॉशिंग्टन सुंदरने फलंदाजी करताना लांब पल्ल्याच्या फटकेबाजीचा सराव केला. त्याला फक्त षटकार आणि चौकार मारायला सांगितले होते. सुनील नारायण सारखाच 'प्लॅन' टीम इंडियासाठीही वापरला जाणार असल्याची चर्चा आहे.

वॉशिंग्टन सुंदरने टी२०, वन डे आणि कसोटी या तिन्ही फॉरमॅटमध्येही अर्धशतकेही झळकावली आहेत. गेल्या वर्षी रांचीमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० सामन्यात सुंदरने अवघ्या २६ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. त्याने आपली क्षमता आधीही सिद्ध केली आहे. त्यामुळे आता गंभीरचा हा प्रयोग यशस्वी होतो की नाही, ते पाहणे औत्सुक्याचे आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकागौतम गंभीरकोलकाता नाईट रायडर्सभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघश्रीलंकावॉशिंग्टन सुंदर