Join us  

यापुढे शंभर शहीद जवानांच्या मुलांना मदत करणार - गौतम गंभीर

आर्मीमध्ये जाता आले नाही याचाच होतोय पश्चाताप, सांगतोय गौतम गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 7:29 PM

Open in App

नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला आर्मीमध्ये जाता आले नाही, याचा आता पश्चाताप होत आहे. पण आर्मीमध्ये जाता आले नसले तरी शहीद जवानांच्या मुलांसाठी गंभीर आपल्या एनजीओच्या माध्यमातून कार्य करत आहे. गंभीरने जवानांच्या 50 मुलांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून मदत केली होती. आता यापुढे शंभर जवानांच्या मुलांना मदत करत असल्याचे गंभीरने सांगितले.

 

 

आर्मीमध्ये जाण्याबद्दल गंभीर म्हणाला की, " क्रिकेट हे माझे पहिले प्रेम कधीच नव्हते. मला आर्मीमध्ये जायचे होते. पण बारावीमध्ये असताना मी दिल्लीकडून रणजी क्रिकेट स्पर्धा खेळलो. माझी कामगिरी चांगली होत गेली. त्यामुळे मी क्रिकेटवर अधिक लक्ष दिले. " 

ओमर अब्दुल्ला यांच्याबरोबर रंगले होते 'ट्विट'युद्ध जम्मू आणि काश्मीरच्या हंदवाडा एन्काऊंटरमध्ये ठार करण्यात आलेला दहशतवादी मन्नान वाणीच्या मृत्यूनंतर टीम इंडियाचा माजी फलंदाज गौतम गंभीर आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यात शाब्दिक ट्विटरयुद्ध रंगले आहे. गंभीरने ओमर अब्दुल्ला व जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना मेंशन करुन ट्विट केले होते. त्यामध्ये, तुमच्यामुळेच एक युवक पुस्तकांपासून भरकटत गोळी चालवण्यास हतबल झाला. आपण एक दहशतवादी, एका कट्टर समर्थकास ठार केलं, असे गंभीरने म्हटले होते. 

गौतम गंभीरच्या ट्विटरला रिप्लाय करताना ओमर अब्दुल्ला यांनी गंभीरला लक्ष्य केलं आहे. या व्यक्तीला (गंभीरला) मन्नानच्या घरचा जिल्हाही माहित नसेल. पण, काश्मीरमधील एक तरुण कशाप्रकारे बंदुक हातात घेतो, याबाबत ते भाष्य करत आहेत. गंभीरला काश्मीरबाबतीत तेवढचं माहित आहे, जेवढं मला क्रिकेटबाबतीत समजतं. मात्र, मला क्रिकेट संदर्भात काहीच माहित नसल्याचा टोलाही ओमर अब्दुल्ला यांनी गंभीरला लगावला आहे. त्यानंतर, गौतमनेही या ट्विटची गंभीर दखल घेत, तुम्ही तर नकाशाच्या बाता मारूच नका, काश्मीरला पाकिस्तानच्या नकाशासोबत जोडण्यासाठी तुम्हीच अधिक कष्ट घेतले आहे. तुम्ही आणि तुमच्या नेत्यांनी काश्मीरमधील तरुणांसाठी काय केलं ? तुम्हीच सांगा असा प्रश्नही गंभीरने विचारला आहे. त्यावर पुन्हा अब्दुल्ला यांनी गंभीरला टार्गेट केलं. मी तुमच्यासोबत वाद घालू इच्छित नाही, ज्यांना राष्ट्रवाद आणि बलिदान माहित नाही, त्यांच्याशी मला चर्चा करायची नाही, असे अब्दुल्ला यांनी म्हटले. 

टॅग्स :गौतम गंभीरभारतीय जवानशहीदपुलवामा दहशतवादी हल्ला