नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून सलामीवीर गौतम गंभीर हा भारतीय संघापासून लांब आहे. त्याचबरोबर स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्येही त्याला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. आता तर विश्वचषकासाठी भारतीय संघ जवळपास निवडण्यात आला आहे. त्यामुळे गंभीर विश्वचचषकही खेळू शकत नाही. त्यामुळे गंभीरने अखेर क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
गंभीरची क्रिकेट कारकिर्द ही पंधरा वर्षांची होती. भारताने 2011 साली विश्वचषक जिंकला. या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत गंभीरने विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. पण त्यानंतर तो काही महिन्यांत संघातून हद्दपार झाला. गेल्या आयपीएलमध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळला. या हंगामात त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळेच त्याला आयपीएल सुरु असतानाच कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.