रोहित शर्मा, विराट कोहलीवर कोच गौतम गंभीर नाराज, बैठकीत खडाजंगी? नेमकं काय घडलं...

Gautam Gambhir vs Virat Kohli Rohit Sharma, Team India : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेतील वाईट कामगिरीनंतर अनेक चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 15:32 IST2025-01-15T15:31:24+5:302025-01-15T15:32:03+5:30

whatsapp join usJoin us
Gautam Gambhir upset with Rohit Sharma, Virat Kohli, scuffle in meeting? What exactly happened... | रोहित शर्मा, विराट कोहलीवर कोच गौतम गंभीर नाराज, बैठकीत खडाजंगी? नेमकं काय घडलं...

रोहित शर्मा, विराट कोहलीवर कोच गौतम गंभीर नाराज, बैठकीत खडाजंगी? नेमकं काय घडलं...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Gautam Gambhir vs Virat Kohli Rohit Sharma, Team India : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावल्यानंतर, BCCI ने शनिवारी आढावा बैठक घेतली. टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा यांनीही यात सहभाग घेतला. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. आता रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, गौतम गंभीर संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या मागण्यांबाबत नाराज आहे. कोणत्याही एक विशिष्ट खेळाडूचे नाव समोर आलेले नाही, पण सुरु असलेल्या ते वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली असल्याची चर्चा आहे.

गंभीरची नाराजी

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियात असल्यापासूनच संघात मतभेद असल्याच्या बातम्या येत आहेत. पर्थ कसोटीतील विजयानंतर खेळाडू वेगवेगळे फिरताना दिसले आणि त्यांनी एकत्र विजय साजरा केला नाही. मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील चर्चा बाहेर आल्या. आता पुन्हा एकदा भारतीय संघाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सीनियर खेळाडूंनी ऑस्ट्रेलियातील सरावाची वेळ आणि हॉटेलशी संबंधित काही खास मागण्या केल्या होत्या. एका सूत्राने सांगितले की, गौतम गंभीर हा सुपरस्टार संस्कृती संपवण्यासाठी आला आहे आणि यामुळे काही खेळाडूंना अडचणी येत आहेत. दुसरीकडे निवड समितीही गंभीरवर खूश नाही. गंभीरने संघनिवडीशी संबंधित बाबींपासून दूर राहावे, अशी निवड समितीची इच्छा आहे.

एक माजी निवडकर्ता म्हणाला- गंभीरमध्ये चॅपलची झलक

एका माजी निवडकर्त्याने गौतम गंभीरची तुलना टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चेल यांच्याशी केली आहे. माजी निवडकर्ता म्हणाला, "एकतर तुम्ही रवी शास्त्रीसारखे मीडिया फ्रेंडली राहा आणि खेळाडूंना सुखावणारी प्रतिमा देणारी विधाने करत राहा किंवा राहुल द्रविड, गॅरी कर्स्टन आणि जॉन राईटसारखे गप्प राहा. तुमचे काम करा आणि खेळाडूंना प्रसिद्धी द्या. चॅपल २००५ ते २००७ पर्यंत टीम इंडियाचे प्रशिक्षक होते. त्यांच्या कार्यकाळात भारतीय खेळाडूंसोबतचे त्यांचे वाद चर्चेत होते. चॅपलची पद्धत भारतात चालणार नाही."

गंभीरच्या मॅनेजरला अतिमहत्त्व दिल्याने निवड समिती नाराज

गौतम गंभीरचा व्यवस्थापक गौरव अरोरा याला अधिक महत्त्व दिल्याने निवड समितीही नाराज आहे. माजी निवडकर्ता म्हणाला की, 'त्यांचा पीए राष्ट्रीय निवडकर्त्यांच्या वाहनात का बसला होता? कारमधील अज्ञात तिसऱ्या व्यक्तीशी ते खाजगीत चर्चाही करू शकत नाहीत. ॲडलेडमध्ये बीसीसीआयच्या व्हीआयपी बॉक्समध्ये त्याला स्थान का देण्यात आलं? ऑस्ट्रेलिया दौऱ्यात गंभीरचा मॅनेजर व्हीआयपी बॉक्समध्ये बसून मॅच पाहताना दिसला होता.

Web Title: Gautam Gambhir upset with Rohit Sharma, Virat Kohli, scuffle in meeting? What exactly happened...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.