नवी दिल्ली : क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता राजकारणाच्या खेळपट्टीवर उतरण्यासाठी भारताचा सलामीवीर गौतम गंभीर सज्ज झाला आहे. गंभीर हा नवी दिल्लीतील एका लोकसभा क्षेत्रासाठी भाजपाच्या तिकिटावर निवडणूकीसाठी उभा राहणार आहे.
यापूर्वी 2014 साली लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी सातपैकी सात जागांवर भाजपाने विजय मिळवला होता. आता भजपाला वाटत आहे की, यावेळी काही जागांवरील उमेदवारांना विरोध होऊ शकतो. त्यामुळे आता काही जागांवर नवीन उमेदवार देण्यासाठी भाजपा प्रयत्नशील असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता गंभीरला एका जागेवर निवडणूकीसाठी उभे करण्याचा विचार भाजपा करत असल्याचे समजत आहे.
गंभीरची विचारधारा ही भाजपासारखीच आहे. त्याचबरोबर जेव्हा गंभीर दिल्लीच्या संघाचे कर्णधारपद भूषवत होता. तेव्हा केंद्रीय मंत्री अरुण जेटली हे दिल्लीच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष होते. तेव्हापासून जेटली आणि गंभीर या दोघांचे चांगले संबंध असल्याचे पाहायला मिळाले आहेत. गंभीर हा जेटली यांचा आवडता खेळाडू होता. त्याचबरोबर आता निवृत्त झाल्यानंतर गंभीर शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी कार्यरत आहे. त्यामुळे गंभीरला यावेळीच दिल्लीतून लोकसभेचे तिकीट दिले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. गंभीर भाजपाकडून निवडणूक लढवणार आहे, ही माहिती त्याच्या जवळच्या व्यक्तींनी दैनिक जागरणला दिली आहे.
शंभर शहीद जवानांच्या मुलांना मदत करणार
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला आर्मीमध्ये जाता आले नाही, याचा आता पश्चाताप होत आहे. पण आर्मीमध्ये जाता आले नसले तरी शहीद जवानांच्या मुलांसाठी गंभीर आपल्या एनजीओच्या माध्यमातून कार्य करत आहे. गंभीरने जवानांच्या 50 मुलांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून मदत केली होती. आता यापुढे शंभर जवानांच्या मुलांना मदत करत असल्याचे गंभीरने सांगितले.

Web Title: Gautam Gambhir's entry on the political pitch, the BJP will get the candidacy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.