जेएनयूतील हल्ल्यावर गौतम गंभीर भडकला, म्हणाला...

या हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 12:45 PM2020-01-06T12:45:33+5:302020-01-06T12:47:20+5:30

whatsapp join usJoin us
Gautam gamnhir was critical of the JNU attack, saying ... | जेएनयूतील हल्ल्यावर गौतम गंभीर भडकला, म्हणाला...

जेएनयूतील हल्ल्यावर गौतम गंभीर भडकला, म्हणाला...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देया हल्ल्यात २० विद्यार्थी जखमी झाले.

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये रविवारी (5 जानेवारी) विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आली आहे. या हल्ल्यात २० विद्यार्थी जखमी झाले. या हल्ल्याचा भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने निषेध केला आहे. त्याचबरोबर ज्यांनी हा हल्ला केला त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

Image

Image

गंभीरने याबाबत एक ट्विट केले आहे. गंभीर म्हणाला की, " जेएनयूमध्ये जे काही झालं तरी देशाच्या मुल्यांना धरून नाही. तुमची विचारधारा काहीही असो, पण विद्यार्थ्यांबरोबर अशी हिंसा होता कामा नये. जे गुंड विद्यापाठीत घुसले आणि हा प्रकार घडवला त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी."

या हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागातील विद्यार्थ्यांनी आपला निषेध नोंदवला आहे. 

Brutal, shocked, beyond belief: How leaders reacted to JNU violence | JNU Violence : <a href='https://www.lokmat.com/topics/jnu-attack/'>जेएनयूमध्ये</a> हिंसाचार; मोदींच्या मंत्र्यांसह विरोधकांकडून हल्ल्याचा निषेध
जेएनयूतील हल्ल्यात 20 जण जखमी झाले असून जखमींमध्ये विद्यार्थी, संघटनांचे नेते आणि शिक्षकांचाही समावेश आहे. विद्यापीठाच्या अनेक दालनांची मोडतोड करण्यात आली आहे. जखमींना उपचारासाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सार्थक (31), कमलेश (30), सुरी कृष्णन (23), गौरव (24), शांभवी (21), वेलेंटिना (26), शिवम चौरसिया (27), मनीष जंगीड (25), शेषमणी साहू (22), आयुशी घोष (23), अमित परमेश्वरम (37), निखिल मॅथ्यू (24), आयुष सिंह (19), ऐश्वर्य प्रताप (25), शौकत (28), उज्ज्वल (22), दीपशिखा (19), सीमित (21), कामरान (20) असे 19  विद्यार्थी जखमी झाले असून, सुचरिता सेन (45) या जखमी शिक्षिकेलाही रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं आहे. या हल्ल्याचा अनेकांनी निषेध नोंदवला आहे.
दरम्यान, या हल्ल्याचे पडसात मुंबईतही दिसत असून जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आयआयटी पवईतील विद्यार्थ्यांनी फ्लॅश मॉब केला.

Web Title: Gautam gamnhir was critical of the JNU attack, saying ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.