Join us  

'जिनिअस' विराट कोहली जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज - जावेद मियादाद

जावेद मियादाद यांनी विराट कोहली अलौलिक असून जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचं म्हणत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2018 1:59 PM

Open in App

इस्लामाबाद - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या एकामागोमाग एक रेकॉर्ड मोडत चालला आहे. आपल्या खेळीने त्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला असून त्याच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, आणि आता या यादीत आणखी एक नाव सामील झालं आहे ते म्हणजे पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार जावेद मियादाद यांचं. जावेद मियादाद यांनी विराट कोहली अलौलिक असून जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचं म्हणत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.  विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरोधातील तिस-या एकदिवसीय सामन्यात 34वं शतक ठोकलं. हा सामना भारताने 124 धावांनी जिंकत मालिकेत 3-0 ने आघाडी घेतली आहे. 

Pakpassion.net ला दिलेल्या मुलाखतीत जावेद मियादाद यांनी सांगितलं की, 'विराट कोहलीचं खेळण्याचं तंत्र आणि भारताला कठीण परिस्थितीतूनही विजयाकडे घेऊन जाण्याची कला त्याला एक महान फलंदाज बनवतं. विराट कोहलीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास त्याच्या खेळण्याच्या पद्दतीमुळेच तो फक्त काही सामन्यांपुरता नाही तर प्रत्येक वेळी धावा करण्यात यशस्वी ठरतो'.

'विराट कोहलीसारख्या फलंदाजांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे समोरील गोलंदाजाचं सामर्थ्य आणि कमकुवत गोष्टी पाहून आपल्या फलंदाजी शैलीत बदल करणं. विराट कोहली एक अलौलिक खेळाडू असून जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे', असं जावेद मियादाद यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :विराट कोहलीजावेद मियादाद