मुंबई पोलिसांकडून उपदेशाचे डोस, हार्दिक पांड्या अन् लोकेश राहुलचे कान टोचले

कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांचे मुंबई पोलिसांनीही कान टोचले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 08:51 AM2019-01-15T08:51:31+5:302019-01-15T08:52:02+5:30

whatsapp join usJoin us
A ‘gentleman’ is always a gentleman - Mumbai Police takes indirect dig at Pandya, Rahul | मुंबई पोलिसांकडून उपदेशाचे डोस, हार्दिक पांड्या अन् लोकेश राहुलचे कान टोचले

मुंबई पोलिसांकडून उपदेशाचे डोस, हार्दिक पांड्या अन् लोकेश राहुलचे कान टोचले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्यालोकेश राहुल यांचे मुंबई पोलिसांनीही कान टोचले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) या दोघांवर निलंबनाची कारवाई केली आहे आणि त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी बोलावले आहे. पण, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहा सदस्यीत समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्या अहवालानंतर पुढील शिक्षा सुनावण्यात येईल.

पांड्या आणि राहुल यांनी 'कॉफी विथ करण 6' मध्ये महिलांबद्दल अपमानजनक विधान केले होते. पांड्याच्या विधानातून तो महिलांचा अनादर करत असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. सोशल मीडियावरही या दोघांचा चांगलाच समाचार घेण्यात आला. त्यात मुंबई पोलिसांनीही उडी मारली आहे. मुंबई पोलिसांनी ''A ‘Gentleman’ is a Gentleman, always and everywhere'' असे ट्विट करून पांड्या व राहुलचे कान टोचले.
 



दरम्यान, बीसीसीआयने बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसीला उत्तर देत पांड्याने माफी मागितली. परंतु, बीसीसीआयने या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलावली आहे. प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एडुल्जी यांनी या दोघांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ''हार्दिक आणि राहुल यांनी कारणे दाखवा नोटीसीला उत्तर दिले आहे. त्यांनी घडलेल्या प्रकाराची माफी मागितली आहे,'' असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. 

Web Title: A ‘gentleman’ is always a gentleman - Mumbai Police takes indirect dig at Pandya, Rahul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.