Join us  

नोकरी करण्यासाठी 'या' दिग्गज खेळाडूची क्रिकेटमधून निवृत्ती; करिअरमध्ये ३० शतके अन्...

वयाच्या ३४ व्या वर्षी या क्रिकेटरनं क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 4:47 PM

Open in App

न्यूझीलंडचा उत्कृष्ट फलंदाज जॉर्ज वर्करनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे. ३४ वर्षीय या खेळाडूनं न्यूझीलंडसाठी १० वनडे आणि २ टी-२० सामने खेळले. त्यात या फलंदाजाने ४ अर्धशतकही काढले परंतु चांगली कामगिरी असतानाही वर्करचं करिअर केवळ १२ सामन्यांत संपुष्टात आलं. जॉर्ज वर्करनं निवृत्ती घेण्याचं कारणही जरा हटके सांगितले आहे. 

डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या जॉर्ज वर्करनं एका मोठ्या कंपनीत चांगली नोकरीची संधी आल्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. तो एका इन्वेस्टमेंट कंपनीत काम करणार आहे. जॉर्ज वर्करने निवृत्ती घेताना सांगितले की, मी माझं १७ वर्षाचं प्रोफेशनल करिअर आता संपवत आहे. मी माझ्या जीवनातील नव्या अध्यायाकडे वळणार आहे. वर्करने त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात सेंट्रल डिस्ट्रिक्टसाठी केली आणि शेवटचा तो ऑकलंडसाठी खेळला. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं सांगायचं झालं तर जॉर्ज वर्करला २०१५ साली पहिल्यांदा टी-२० सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर तो काही वनडे क्रिकेटही खेळला. २०१८ येईपर्यंत जॉर्ज वर्करचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं होते. जॉर्ज वर्कर हा न्यूझीलंडच्या चांगल्या खेळाडूंपैकी एक होता. भलेही त्याचा फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये रेकॉर्ड चांगला नसला तरीही वनडे, टी-२० स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली. 

या डावखुऱ्या फलंदाजाने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १२६ सामने खेळले, ज्यात त्याने ११ शतकांच्या बळावर ६४०० रन्स मारले होते. त्याशिवाय १६० ग्रुप ए सामन्यांत ६७२१ रन्स जॉर्ज वर्करने केले होते. या खेळाडूने त्याच्या करिअरमध्ये १८ सेंच्युरीही मारल्या. टी-२० मध्ये वर्करने १५४ मॅचमध्ये ३४८० रन्स मारले होते. त्याच्या बॅटने एक शतकही झळकले. याप्रकारे प्रोफेशनल क्रिकेटमध्ये जॉर्ज ३० शतक आणि १६ हजाराहून अधिक रन्स बनवून निवृत्ती घेत असल्याचं घोषित केले आहे.

कोहलीला अंडर १९ वर्ल्डकपमध्ये आऊट केलं होतं

वर्करनं २००७-०८ साली सीजनमध्ये सेंट्रल डिस्ट्रिक्टसमध्ये डेब्यू केले आणि त्यानंतर अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत त्याने न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केले होते. त्याने भारतीय खेळाडू विराट कोहलीसोबतही मॅच खेळली. त्याने कोहलीला आऊट केले होते. अलीकडेच ऑकलँड एसेस फोर्ड ट्रॉफी २०२१-२२ पुरस्कार जिंकण्यात त्याने महत्त्वाची भूमिका निभावली होती. 

टॅग्स :न्यूझीलंड