Join us  

धोनीसोबत खेळण्याची इच्छा व्यक्त करणारा कोएत्जी MI च्या ताफ्यात; काय आहे त्याचा रेकॉर्ड?

दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्जीने आयपीएल लिलावाआधी एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई संघात खेळण्याची इच्छा व्यक्त केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 3:36 PM

Open in App

आयपीएल २०२४ साठी आज दुबईत खेळाडूंचा लिलाव पार पडत आहे. या लिलावात खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला आहे. मिनी लिलावादरम्यान, रोव्हमन पॉवेलवर पहिली बोली लावण्यात आली. त्यानंतर हॅरी ब्रूक आणि ट्रॅव्हिस हेडसारख्या स्टार्सवर पैशांचा पाऊस पडला. या लिलावामुळे अनेक खेळाडू करोडपती झाले आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्जीने आयपीएल लिलावाआधी एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई संघात खेळण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानूसार लिलावात त्याला खरेदी करण्यासाठी चेन्नई आणि लखनौच्या फ्रँचायझीने रस दाखवला पण मुंबईने बाजी मारली. कोएत्जीला मुंबई इंडियन्सने ५ कोटींना विकत घेतले आहे. कोएत्जीची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. 

कोण आहे गेराल्ड कोएत्जी, रेकॉर्ड काय?

२३ वर्षीय गेराल्ड कोएत्जी दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज आहे. कोएत्जी भेदक गोलंदाजीसोबत स्विंगचा माराही करतो. सुरुवातीला आणि डेथ ओव्हरमध्येही गोलंदाजी करण्यात गेराल्ड कोएत्जी माहीर आहे. इतकेच नाही तर तळाला मोठे फटके मारण्याची क्षमताही गेराल्ड कोएत्जीमध्ये आहे. २०२३ च्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान गेराल्ड कोएत्जी हा दक्षिण आफ्रिकेचा सर्वोत्तम गोलंदाज होता. त्याने ८ सामन्यात १९.८० च्या सरासरीने २० विकेट घेतल्या आणि सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत चौथ्या स्थानावर राहिला.

मार्च २०२३मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून, कोएत्झीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झपाट्याने छाप पाडली. १४ एकदिवसीय सामन्यांमध्ये २३.२२च्या सरासरीने ३१ बळी घेऊन, त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात उल्लेखनीय सातत्य आणि कौशल्य दाखवले आहे. कोएत्झीकडे मोठे फटके मारण्याची क्षमता देखील आहे. 

पॅट कमिन्सवर मोठी बोली-

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सवर ऐतिहासिक बोली लावण्यात आली. खरं तर कमिन्सला तब्बल २०.५० कोटी रूपयांत सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीने आपल्या संघाचा भाग बनवले. कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. तर डॅरेल मिचेल याला धोनीच्या चेन्नईने आपल्या ताफ्यात घेतलेय. त्याच्यासाठी चेन्नईने १४ कोटी रुपये खर्च केले.  भारतीय संघाचा अष्टपैलू हर्षल पटेलसाठी गुजरात आणि पंजाब संघामध्ये लढत झाली. पंजाब संघाने हर्षल पटेल याला ११ कोटी ७५ लाख रुपयांत खरेदी केले. 

टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्सद. आफ्रिका