Join us  

MS Dhoni चं लक्ष वेधण्यासाठी साक्षीला काय काय करावं लागतंय? पाहा फोटो

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धाही एका वर्षानं पुढे ढकलण्यात आली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 10:59 AM

Open in App

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धाही एका वर्षानं पुढे ढकलण्यात आली आहे आणि इंडियन प्रीमिअर लीगची पुढील सुचनेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेटपटू आपापल्या कुटुंबीयांना वेळ देत आहेत. पण, आयपीएल स्थगित झाल्यामुळे महेंद्रसिंग धोनीच्या टीम इंडियातील पुनरागमनाच्या आशा मावळत चालल्या आहेत. तो कुटुंबीयांसोबत आहे, परंतु त्याचं लक्ष घरात नाही असं चित्र सध्या दिसत आहे. धोनीचं लक्ष वेधण्यासाठी पत्नी साक्षीला प्रयत्न करावे लागत आहेत. साक्षीनं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आणि त्याखाली लिहीले की,''मिस्टर स्वीटी ( धोनी)चं लक्ष वेधण्यासाठी काय कराव लागतंय ते पाहा.''

इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. मागील नऊ महिन्यांपासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. या कालावधीत त्यानं आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवला. पण, आयपीएलमधील त्याच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. आता आयपीएल होण्याची शक्यताही मावळत चालली आहे. अशात धोनी रांची येथे आपल्या आलीशान घरात कुटुंबीयांना वेळ देत आहे. धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत. साक्षीनं शेअर केलेला फोटो... 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

'त्या' सहा षटकारानंतर झाली होती बॅटची तपासणी; खुद्द युवराजनं दिली माहिती

मानवी कातडी घालून प्राणी फिरत आहेत; गौतम गंभीरकडून तीव्र शब्दात निषेध

ठाकरे सरकार झोपा काढत आहे का?; बबिता फोगाटची टीका

 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीकोरोना वायरस बातम्या